शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
2
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
4
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
5
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
6
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
7
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
8
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
9
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
10
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
11
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
12
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
13
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
14
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
15
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
16
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
17
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
18
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
19
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
20
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

...अन् 'ती' 96 गुरं पुन्हा शाकाहारी झाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2019 20:54 IST

गोशाळेतील कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांना अखेर यश

पणजी : कळंगुट-कांदोळीच्या भागातून प्रथम 76 आणि त्यानंतर 20 असे मिळून आतापर्यंत एकूण 96 बेवारस गुरे पकडून मये सिकेरी येथील गोशाळेत पाठविण्यात आली. ही गुरे शाकाहारी काही खातच नाहीत, त्यांना मांसाहाराचीच चटक लागली व ती मांसाहारी झाली अशा प्रकारचे वृत्त देशभर पसरले. त्यावर सर्वत्र चविष्ट अशी चर्चाही झाली. पण गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या बऱ्याच प्रयत्नांनंतर व उपाययोजनांनंतर ही सगळी गुरे आता पुन्हा शाकाहारी झाली आहेत.कळंगुटमध्ये रस्त्यावर बसणाऱ्या बेवारस गुरांना उचलून गोशाळेत नेण्याची मोहीम कळंगुटचे आमदार तथा राज्याचे मंत्री मायकल लोबो यांच्या सूचनेनंतर कळंगुटच्या पंचायतीने सुरू केली. ही गुरे रस्त्यावर अपघातास कारण ठरत होती. प्रथम कळंगुटमधील गुरे नेली गेली. मग कांदोळीतील रस्त्यांवर बसणाऱ्या वीस गुरांना उचलून नेऊन त्यांची मयेच्या गोशाळेत त्यांची रवानगी करण्यात आली. मंत्री लोबो यांनी मंगळवारी लोकमतला सांगितले की, यापुढे पर्रा येथे गुरे उचलण्याची मोहीम सुरू केली जाईल.लोबो यांनी गोशाळेला भेट दिली होती. गोशाळेत या गुरांच्या खाण्याची सोय व्हावी म्हणून आपण गोशाळेला मदतही करू असे त्यांनी जाहीर केले. मात्र कळंगुट- कांदोळीहून आणलेली गुरे शाकाहारी खाद्य खात नाहीत असा अनुभव येऊ लागल्याने थोडी धावपळ उडाली. कळंगुटच्या पट्ट्यात अनेक हॉटेल्स व रेस्टॉरंट्सची गर्दी आहे. तिथे गुरे कचऱ्यातील चिकनचे तुकडे, टाकाऊ मासळी वगैरे खाऊन मांसाहारी बनली होती. त्यांना पूर्णपणे मांसाहाराचीच  सवय झाली होती. त्यामुळे गोशाळेत अडचण झाली. कळंगुट- कांदोळीची गुरे गोशाळेतील चारा, पाला किंवा इतर प्रकारचे कोणतेही शाकाहारी खाद्य खात नव्हती. मंत्री लोबो यांनी सांगितले की, या गुरांनी शाकाहारी खाद्य खावे म्हणून गोशाळेत खूप प्रयत्न झाले. गुरांचे डॉक्टर्स तसेच अन्य अनुभवी व्यक्तींनी प्रयत्न केले. त्यांना शिजवलेले चणेदेखील खायला घातले गेले. काही दिवसांच्या प्रयत्नांनंतर आता पुन्हा ही गुरे शाकाहारी खाद्य खाऊ लागली आहेत व त्यामुळे समस्या सुटली आहे. 

टॅग्स :goaगोवा