गोव्यातील दहा-बारा नद्यांमधील गाळ उपसणार - मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2019 12:36 PM2019-09-25T12:36:34+5:302019-09-25T12:51:24+5:30

गोव्यातील दहा ते बारा नद्यांमधील गाळ उपसण्याची गरज आहे. सरकार हे काम करून घेईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले आहे.

Sludge remove from rivers in Goa | गोव्यातील दहा-बारा नद्यांमधील गाळ उपसणार - मुख्यमंत्री

गोव्यातील दहा-बारा नद्यांमधील गाळ उपसणार - मुख्यमंत्री

Next
ठळक मुद्देगोव्यातील दहा ते बारा नद्यांमधील गाळ उपसण्याची गरज आहे - डॉ. प्रमोद सावंत सरकार नद्या उपसण्याचे काम विविध खात्यांकडून करून घेईल. सरकार कधीच म्हादई नदीबाबत तडजोड करणार नाही.

पणजी - गोव्यातील दहा ते बारा नद्यांमधील गाळ उपसण्याची गरज आहे. सरकार हे काम करून घेईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बुधवारी (25 सप्टेंबर) सांगितले आहे. कलाकृती आयोजित गोवा पर्यावरण महोत्सवाला पर्वरी येथे आरंभ झाला आहे. महोत्सवाचे उद्घाटन केल्यानंतर मुख्यमंत्री पत्रकारांशी बोलले. राज्यातील नद्या उपसल्या जातील. काहीजण नद्या उपसण्याच्या कामात अडथळे आणतात. काही एनजीओही आक्षेप घेतात. मात्र सरकार नद्या उपसण्याचे काम विविध खात्यांकडून करून घेईल. एनजीओंना त्याचे महत्त्व कळायला हवे.

मुख्यमंत्री म्हणाले, की नद्या जर आता उपसल्या नाहीत तर ते काम कधीच होणार नाही. आमच्या अनेक नद्या बुजत चालल्या आहेत. नद्या वाचविणो, पाणी वाचविणे याविषयी जागृती होण्याची गरज आहे. मी जलसंसाधन खाते व बंदर कप्तान खात्याशी बोललो आहे व त्यांना नद्या उपसण्यासाठीची प्रक्रिया सुरू करण्यास सांगितले आहे. थोडा वेळ लागेल पण काम सुरू होईल.

पर्यावरण महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, की पूर्वी तीन दिवस होणारा पर्यावरण महोत्सव आता एका दिवसापूरता मर्यादित करावा लागला हे ऐकून मला वाईट वाटले. समाजासाठी काम करणारे अनेक लोक असतात. कोणतेही सामाजिक काम जर अडत असेल तर माझ्याशी संपर्क साधा. मी निश्चितच मदत करीन. कारण समाजाचे काम करणारे एक प्रकारे सरकारला मदत करत असतात. पर्यावरण महोत्सवासारख्या सोहळ्यांची नितांत गरज आहे.

मुख्यमंत्री म्हणाले, की विद्यार्थ्यांना पर्यावरण हितरणक्षणाची सवय लावायला हवी. आपण सगळेजण मानवी चुकांचे परिणाम भोगत आहोत. प्लास्टीकपासून ई-कचऱ्यापर्यंतची समस्या ही मानवनिर्मित आहे. प्लास्टीक पिशव्यांचा वापर टाळायलाच हवा. आम्ही पर्यावरणावर प्लास्टीक थोपले. त्याचे परिणाम सगळीकडे दिसून येत आहेत.

मुख्यमंत्र्यांनी म्हादई नदीचाही उल्लेख केला. सरकार कधीच म्हादई नदीबाबत तडजोड करणार नाही. छोट्या छोट्या नद्या काहीजण बुजविण्याचा प्रयत्न करतात. या नद्या वाचवायला हव्यात. म्हापसा शहरातही मोठी नदी आहे. तिचे अस्तित्व धोक्यात आले आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले आहेत. 

 

Web Title: Sludge remove from rivers in Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.