जागावाटप नंतर ठरेल, आमचे सर्व मतदारसंघात काम सुरू; दामू नाईक यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2026 12:46 IST2026-05-12T12:46:19+5:302026-05-12T12:46:40+5:30

विधानसभा निवडणूक केव्हाही जाहीर झाल्या तरी आम्ही निवडणुकीला सामोरे जाण्यास पूर्णपणे सज्ज आहोत.

seat allocation will be decided later our work is underway in all constituencies goa bjp state president damu naik information | जागावाटप नंतर ठरेल, आमचे सर्व मतदारसंघात काम सुरू; दामू नाईक यांची माहिती

जागावाटप नंतर ठरेल, आमचे सर्व मतदारसंघात काम सुरू; दामू नाईक यांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : विधानसभा निवडणूक केव्हाही जाहीर झाल्या तरी आम्ही निवडणुकीला सामोरे जाण्यास पूर्णपणे सज्ज आहोत. जागा वाटप व इतर गोष्टी नंतर ठरतील. पण सध्या आम्ही सर्व ४० मतदारसंघात काम सुरू केले आहे, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी दिली.

प्रदेशाध्यक्ष नाईक यांनी सांगितले की, 'जागा वाटप, युती आणि इतर राजकीय समीकरणांबाबत योग्य वेळी निर्णय घेतला जाईल. मात्र, सध्या संघटन बळकट करणे आणि प्रत्येक मतदारसंघात कार्यकर्त्यांशी संपर्क वाढवणे हे पक्षाचे मुख्य लक्ष्य आहे. निवडणुका जाहीर होण्यापूर्वी प्रत्येक मतदारसंघात भाजपची ताकद वाढीसाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.'

मगोविषयी विचारलेल्या प्रश्नाबाबत दामू म्हणाले की, 'मगो हा स्वतंत्र राजकीय पक्ष आहे आणि ते त्यांच्या भूमिकेनुसार निर्णय घेतात. त्यांच्या अंतर्गत राजकीय भूमिकांबाबत आम्हाला अधिक भाष्य करायचे नाही. भाजपची ध्येय्य धोरणे आणि जबाबदाऱ्या वेगळी आहेत. मगोचा सरकारमध्ये युती असल्याने ते विषय त्या पातळीवर हाताळले जातील. प्रियोळ मतदारसंघात भाजपचा आमदार असल्यामुळे त्या जागेवर आमचा दावा कायम आहे.
 

Web Title : सीट बंटवारा बाद में, सभी निर्वाचन क्षेत्रों में काम जारी: दामू नाइक

Web Summary : दामू नाइक का कहना है कि भाजपा कभी भी चुनाव के लिए तैयार है। सीट बंटवारे के फैसले बाद में होंगे। फिलहाल, सभी 40 निर्वाचन क्षेत्रों में काम चल रहा है। पार्टी का ध्यान चुनाव से पहले संगठन को मजबूत करने पर है। एमजीपी के बारे में नाइक ने कहा कि वे स्वतंत्र हैं; भाजपा सरकार स्तर पर गठबंधन के मामलों को संभालेगी।

Web Title : Seat allocation later, work underway in all constituencies: Damu Naik

Web Summary : BJP is ready for elections anytime, says Damu Naik. Seat sharing decisions will follow. Currently, work is progressing in all 40 constituencies. The party focuses on strengthening organization before elections. Regarding MGP, Naik stated they are independent; BJP will handle coalition matters at government level.