शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
5
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
6
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
7
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
8
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
9
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
10
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
11
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
12
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
13
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
14
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
15
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
16
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
17
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
18
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
19
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
20
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
Daily Top 2Weekly Top 5

आयुर्वेदातून आरोग्यसेवेची नवी दिशा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2026 10:40 IST

हेल्थ विथ आयुर्वेद उपक्रमाचा प्रारंभ, वाढदिवसानिमित्त लोकांकडून शुभेच्छा

लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : आयुर्वेदाच्या माध्यमातून राज्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने 'हेल्थ विथ आयुर्वेद चेक्ड बाय डॉक्टर २.०' हा विशेष आरोग्य उपक्रम उत्साहात पार पडला. या बहुविशेषज्ञ (मल्टिस्पेशालिटी) आयुर्वेदिक आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत, आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्या हस्ते करण्यात आले. मोफत आयुर्वेद टेलिकन्सल्टेशनसाठीच्या पोर्टलचे उद्घाटन करण्यात आले. आयुष डॉक्टरांची उपलब्धता वाढविणे आणि सिंगल विंडो सिस्टीमद्वारे विविध आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.

गोवा कॉलेज ऑफ नॅचरोपथी व हरवळेतील योगिक सायन्स महाविद्यालयात हा कार्यक्रम उत्साहात झाला. शिबिरामध्ये नागरिकांना विविध आयुर्वेद तज्ज्ञांकडून मोफत आरोग्य तपासणी, सल्ला आणि उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. पचनसंस्था विकार, सांधेदुखी, त्वचारोग, ताण-तणाव आदी आजारांवर आयुर्वेदिक उपचार, मार्गदर्शन देण्यात आले.

सर्व मतदार संघात शिबिर

मुख्यमंत्री सावंत यांनी आयुर्वेद ही भारताची प्राचीन व प्रभावी वैद्यकीय परंपरा असून ती आधुनिक जीवनशैलीतही अत्यंत उपयुक्त असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, 'राज्यातील सर्व ४० मतदारसंघांमध्ये अशा प्रकारचे एकात्मिक आरोग्य शिबिर आयोजित करून नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा देण्याचा सरकारचा मानस आहे. वाढत्या कॅन्सर, मधुमेह व डायलेसिस रुग्णसंख्या ही चिंतेची बाब असल्याचे ते म्हणाले.

शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नागरिकांनी मोठ्या संख्येने आरोग्य तपासणीचा लाभ घेतला. कार्यक्रमाला डॉ. सुजाता कदम, निलेश कोरडे, मिताली जोशी, पांडुरंग कुट्टीकर, संतोष मळीक, डॉ. स्नेहा भागवत व डॉक्टरांची टीम उपस्थित होती.

विद्यार्थ्यांकडून शुभेच्छा...

येथील प्रोग्रेस हायस्कूलमध्ये मुख्यमंत्री सावंत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत त्यांच्यासोबत वाढदिवस साजरा केला. वाढदिवसाचा केक कापण्यात आला. रवींद्र भवनात डॉ. सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त रांगोळी, चित्रकला प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. राज्याच्या विविध भागातून आलेल्या लोकांनी सावंत यांना शुभेच्छा दिल्या.

आरोग्य, शिक्षण क्षेत्रात मोठे परिवर्तन : राणे

आरोग्यमंत्री राणे यांनी सांगितले की, 'अशा उपक्रमांमुळे नागरिकांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता वाढण्यास मदत होईल आणि आयुर्वेदिक उपचार पद्धतीवरील विश्वास अधिक दृढ होईल.

गेल्या आठ वर्षांत राज्यातील आरोग्य व शिक्षण क्षेत्रात मोठे परिवर्तन घडवून आणण्यात आले आहे. रोजगारनिर्मितीवरही भर देण्यात आला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सात वर्षांत चांगले कार्य केले. रोजगाराभिमुख शिक्षणावर भर दिला. पुढील काळातही अशाच प्रकारे राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न सुरू राहतील.'

यावेळी आगामी निवडणुकीतही डॉ. प्रमोद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे असे आवाहन त्यांनी केले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Ayurveda offers new direction for healthcare: Chief Minister Pramod Sawant.

Web Summary : CM Sawant launched 'Health with Ayurveda Checked by Doctor 2.0', promoting Ayurveda in healthcare. Free check-ups and teleconsultations were offered. The government aims to provide comprehensive health facilities in all constituencies, addressing rising concerns about cancer and diabetes. Focus on holistic development and employment generation is paramount.
टॅग्स :goaगोवाAyurvedic Home Remediesघरगुती उपायPramod Sawantप्रमोद सावंत