शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
3
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
4
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
5
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
6
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
7
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
8
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
9
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
10
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
11
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
12
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
13
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
14
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
15
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
16
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
17
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
18
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
19
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
20
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
Daily Top 2Weekly Top 5

इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून कोसळून २३ वर्षीय कामगाराचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2020 21:31 IST

वास्को पोलीसांनी दिली असून हे प्रकरण त्यांच्याकडून सध्या अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे वास्को भागात मागच्या काही काळापासून राहत असून तो मूळ उत्तरप्रदेश येथील असल्याची माहिती पोलीसांनी दिली. वास्को पोलीस सदर प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

वास्को - दक्षिण गोव्यातील आल्त दाबोळी भागातील महामार्गाच्या बाजूला बांधकाम चालू असलेल्या इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून रवीचंद्रन बिंद नामक कामगार खाली कोसळून जागीच ठार झाला. मरण पोचलेला हा कामगार २३ वर्षीय असल्याची माहिती वास्को पोलीसांनी दिली असून हे प्रकरण त्यांच्याकडून सध्या अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आले आहे.

वास्को पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक निखील पालयेकर यांनी दिलेल्या माहीतीनुसार गुरूवारी (दि.३०) दुपारी २.३० च्या सुमारास सदर घटना घडली. आल्त दाबोळी येथे एका इमारतीचे बांधकाम चालू असून या इमारतीच्या सहाव्या मजल्यावर रवीचंद्रन हा ‘प्लास्टरींग’ चे काम करत होता. रवीचंद्रन हा ‘पेन्टर’ असून प्लास्टरींगचे काम करताना अचनक तो सहाव्या मजल्यावरून खाली जमनीवर कोसळून जागीच ठार झाल्याची माहीती पोलीसांनी दिली. पोलीसांना माहीती मिळताच त्यांनी त्वरित घटनास्थळावर धाव घेऊन मयत रवीचंद्रनच्या मृतदेहाचा पंचनामा करून तो शवचिकित्सेसाठी बांबोळीच्या गोमॅकॉ इस्पितळात पाठवून दिला.

मरण पोचलेला रवीचंद्रन हा शांतीनगर, वास्को भागात मागच्या काही काळापासून राहत असून तो मूळ उत्तरप्रदेश येथील असल्याची माहिती पोलीसांनी दिली. रवीचंद्रन या इमारतीवरून अपघाती पडला की यामागे अन्य काही कारण आहे का याबाबत पोलीस तपास करीत असून सध्या हे प्रकरण अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद केले असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक निखील पालयेकर यांनी दिली. वास्को पोलीस सदर प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Deathमृत्यूgoaगोवाPoliceपोलिस