शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
3
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
4
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
5
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
6
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
7
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
8
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
9
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
10
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
11
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
12
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
13
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
14
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
15
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
16
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
17
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
18
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
19
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
20
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रातील निवडणूक निकालाने गोव्यातील भाजपच्या उत्साहाला मर्यादा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2019 11:44 IST

मुख्यमंत्री प्रमोद सावंत, उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, मंत्री मिलिंद नाईक, आरोग्य मंत्री विश्वजित राणो, बांधकाम मंत्री दिपक प्रभू पाऊसकर या सर्वानी महाराष्ट्रात जाऊन भाजपचे प्रचार काम केले.

पणजी : गोव्यातील भाजपच्या अनेक नेत्यांनी, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी, शेकडो पदाधिकारी व कार्यकत्र्यानी यावेळी प्रथमच महाराष्ट्रात तळ ठोकून महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीवेळी प्रचार केला होता पण जिथे जिथे गोवा भाजपचे नेते प्रचारासाठी गेले, तिथे भाजपचे उमेदवार काही निवडून आले नाहीत. यामुळे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप- शिवसेना युती जिंकली तरी, गोवा भाजपच्या उत्साहाला मात्र मर्यादा पडल्याचे संकेत येथील नेत्यांच्या चर्चेतून मिळत आहेत.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत, उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, मंत्री मिलिंद नाईक, आरोग्य मंत्री विश्वजित राणो, बांधकाम मंत्री दिपक प्रभू पाऊसकर या सर्वानी महाराष्ट्रात जाऊन भाजपचे प्रचार काम केले. मुख्यमंत्र्यांनी कोल्हापुर, साताराच्या पट्टय़ात जाऊन युवकांशी संवाद साधण्याचे कार्यक्रम घेतले. गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी चार दिवस महाराष्ट्रात निवडणूक प्रचारासाठी तळ ठोकला होता. मनोहर र्पीकर मुख्यमंत्रीपदी असताना महाराष्ट्रातील निवडणुकांमध्ये जेवढे प्रचार कार्य करायचे, त्यापेक्षा जास्त प्रचार काम प्रमोद सावंत यांनी यावेळी केले. उपमुख्यमंत्री कवळेकर यांनी पनवेल व अन्य भागांमध्ये जाऊन भाजपचे प्रचार काम केले.

मंत्री पाऊसकर यांनी पेण भागात तर गोव्याचे आरोग्य मंत्री राणे यांनी दोडामार्ग-सावंतवाडीच्या भागात राजन तेली यांच्यासाठी प्रचार केला. भाजपचे संघटन मंत्री सतिश धोंड व इतरांनी कोंकणात तळ ठोकला होता. माजी खासदार खासदार नरेंद्र सावईकर, सरचिटणीस सदानंद श्ेाट तानावडे यांनीही सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपचे प्रचार काम केले. गोव्यातील भाजप नेत्यांनी प्रचार केलेल्या बहुतांश भागात भाजपचा पराभवच झाला.

जर आम्ही प्रचार केलेल्या भागात भाजपचे उमेदवार जिंकेल असते तर आमचा उत्साह वाढला असता, असे गोव्यातील भाजप नेत्यांनी महाराष्ट्रातील निवडणूक निकालानंतर सांगितले. मुख्यमंत्री सावंत यांनी मात्र महाराष्ट्र व हरियानात पुन्हा आमचे सरकार अधिकारावर येत आहे याविषयी आनंद वाटतो असे सांगितले. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदनही केले.

टॅग्स :sawantwadi-acसावंतवाडीBJPभाजपाgoaगोवाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019