शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

आयआयटी शेवटी सत्तरी तालुक्यात येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2019 16:18 IST

आयआयटी शैक्षणिक प्रकल्पाला सांगे, काणकोण, केपेच्या पट्टय़ात विरोध झाल्यानंतर हा प्रकल्प अखेर सत्तरी तालुक्यातील गुळेली येथे उभा करावा अशा निर्णयाप्रत गोवा सरकार आले आहे.

पणजी : आयआयटी शैक्षणिक प्रकल्पाला सांगे, काणकोण, केपेच्या पट्टय़ात विरोध झाल्यानंतर हा प्रकल्प अखेर सत्तरी तालुक्यातील गुळेली येथे उभा करावा, अशा निर्णयाप्रत गोवा सरकार आले आहे. आयआयटीसाठी दि. 31 ऑगस्टर्पयत जागा निश्चित करा, अशी सूचना केंद्र सरकारने गोव्याला केली होती. त्यानुसार गुळेली येथे 10 लाख चौरस मीटर क्षेत्रफळाची जागा सरकारने निश्चित केली आहे.मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी मंत्रिमंडळाची बैठक घेतली. आयआयटी शैक्षणिक संस्था गोव्यात आली तरी, या संस्थेसाठी गोव्यात स्वतंत्र इमारत बांधण्यासाठी गोवा सरकारला जागा मिळाली नाही. काणकोणलाही आयआयटीसाठी विरोध झाला. एनआयटीसाठी कुंकळ्ळीत इमारत उभी होत आहे पण आयआयटीसाठी जागा मिळत नसल्याने गोवा सरकारची अडचण झाली होती. जागा निश्चित झाली नाही तर गोव्याला आयआयटीसारख्या मोठय़ा राष्ट्रीय प्रतिष्ठेच्या संस्थेला मुकावे लागेल याची कल्पना सरकारला आली. मुख्यमंत्री सावंत यांनी गुळेली येथे जागा पाहिली व तिच जागा आयआयटीसाठी निश्चित झाली आहे. सत्तरीत यापूर्वी गोवा व्यवस्थापन संस्था साकारली आहे.मंत्रिमंडळाच्या बैठकीत गुळेलीच्या जागेविषयी शुक्रवारी चर्चा झाली. गुळेली येथेच आयआयटी उभी करावी लागेल अशी कल्पना मुख्यमंत्र्यांनी अन्य मंत्र्यांना दिली. त्याविषयीचा प्रस्ताव तत्तत: मंजुरही झाला. महसुल खात्याच्या ताब्यातून ही जागा शिक्षण खात्याच्या ताब्यात यापुढील काळात दिली जाईल. गुळेली हा वाळपई मतदारसंघातील भाग आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आयआयटीविषयी वाळपईचे आमदार व आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांच्याशी चर्चा केली होती. मंत्री राणे यांनी आयआयटी संस्था गुळेलीला येत असेल तर आपला पाठींबाच असेल असे स्पष्ट केले. देशाच्या शैक्षणिक नकाशावर सत्तरीचा भाग पोहचेल असे राणे म्हणाले. दरम्यान, शिक्षण सचिव निला मोहनन यांनीही शुक्रवारी लोकमतशी बोलताना गुळेली येथे आयआयटी संस्था साकारेल असे सांगितले.

टॅग्स :goaगोवाEducation Sectorशिक्षण क्षेत्र