शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

बोंडला अभयारण्याचा चेहरा-मोहरा बदलणार; केंद्राकडून 50 कोटी मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2019 14:12 IST

गोव्यातील बोंडला अभयारण्याचा चेहरा  मोहरा येणाऱ्या काळात बदलणार आहे.

ठळक मुद्देगोव्यातील बोंडला अभयारण्याचा चेहरा  मोहरा येणाऱ्या काळात बदलणार आहे. केंद्र सरकारकडून मंजूर झालेल्या 50 कोटी रुपये निधीतून अभयारण्यातील वन्य प्राण्यांचे जुने पिंजरे बदलण्यात येणार असून तेथे नवे पिंजरे येणार आहेत. गोव्याचे पर्यटन किनाऱ्यांपुरतेच मर्यादित राहू नये, तर राज्यातील अभयारण्ये तसेच अंतर्गत भागातही पर्यटक पोचावेत, अशी सरकारची इच्छा आहे.

पणजी - गोव्यातील बोंडला अभयारण्याचा चेहरा  मोहरा येणाऱ्या काळात बदलणार आहे. केंद्र सरकारकडून मंजूर झालेल्या 50 कोटी रुपये निधीतून अभयारण्यातील वन्य प्राण्यांचे जुने पिंजरे बदलण्यात येणार असून तेथे नवे पिंजरे येणार आहेत. तसेच काही ठिकाणी विस्तारही केला जाणार आहे. गोव्याचे पर्यटन किनाऱ्यांपुरतेच मर्यादित राहू नये, तर राज्यातील अभयारण्ये तसेच अंतर्गत भागातही पर्यटक पोचावेत, अशी सरकारची इच्छा आहे.

पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष आमदार दयानंद सोपटे यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, केंद्रीय अभयारण्य प्राधिकरणाने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार या अभयारण्यात वन्य प्राणी संवर्धनाच्या दृष्टिकोनातून आवश्यक ती पावले उचलली जाणार आहेत. 50 कोटी रुपये खर्चाच्या कामांना केंद्र सरकारने मंजुरी दिलेली आहे. वन खात्याचा ना हरकत दाखला मिळाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. कारण ही मालमत्ता वन खात्याच्या अखत्यारित येते.

गोवा पर्यटन विकास महामंडळाच्या संचालकांची बैठक नुकतीच पार पडली आहे. या बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले आहेत. गोव्याचे पर्यटन किनाऱ्यांपुरतेच मर्यादित राहू नये, तर राज्यातील अभयारण्ये तसेच अंतर्गत भागातही पर्यटक पोचावेत, अशी सरकारची इच्छा आहे. महामंडळाच्या ठिकठिकाणी मालमत्ता असून त्यात अतिक्रमण झालेले आहे. अतिक्रमणे ताबडतोब हटवण्याची व आवश्यक ती कारवाई करण्याचा महत्त्वाच्या निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. तसेच हणजुण येथे येथे जीटीडीसीच्या मालमत्तेतील अलीकडेच पाडण्यात आलेले बांधकाम हा विषय चर्चेत आला असता तेथे आता महामंडळातर्फे रेस्टॉरंट उभे करण्याचा निर्णय झाला. 

दोन कंपन्यांनी यासाठी तयारी दर्शवली आहे. रस्त्याच्या कडेला स्वयंपाक करणारे पर्यटक आता 'लक्ष्य' बनवले जातील. उघड्यावर स्वयंपाक करून कचरा करणार्‍या पर्यटकांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. किनाऱ्यांवरील प्रसाधनगृहे, कपडे बदलण्यासाठीच्या खोल्या आदी सुविधा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या असाव्यात यासाठी आवश्यक असलेली सर्व पावले उचलली जातील. तसेच पार्किंग व्यवस्थाही नीटनेटकी केली जाईल. राज्याचा पर्यटन हंगाम गेल्या 4 ऑक्टोबर रोजी सुरू झालेला आहे. रशियाची चार्टर विमाने दाखल झालेली आहेत.

 

टॅग्स :goaगोवाtourismपर्यटन