शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात उच्च शिक्षणामध्ये मुलींचे प्रमाण 35 टक्के; देशात दहाव्या क्रमांकावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2019 14:50 IST

उच्च शिक्षणामध्ये गोव्यातील 18 ते 23 वयोगटातील मुलींचे प्रमाण 35 टक्के असल्याचे समोर आले आहे. अखिल भारतीय उच्च शिक्षणाच्या  2018- 19 च्या सर्वेक्षणात ही माहिती समोर आली आहे.

पणजी: उच्च शिक्षणामध्ये गोव्यातील 18 ते 23 वयोगटातील मुलींचे प्रमाण 35 टक्के असल्याचे समोर आले आहे. अखिल भारतीय उच्च शिक्षणाच्या  2018- 19 च्या सर्वेक्षणात ही माहिती समोर आली आहे. गेल्या सहा वर्षांच्या काळात टक्केवारी सुमारे 4 टक्क्यांनी वाढली असली तरी राष्ट्रीय स्तरावर एकूण राज्ये आणि संघप्रदेशांमध्ये गोव्याचे स्थान दहावे आहे. 2013-14 मध्ये याबाबतीत गोवा आठव्या क्रमांकावर होता.

गोव्यातील असंख्य मुली पुणे येथे उच्च शिक्षणासाठी असल्याने पालकांचा पुणे येथे घर खरेदीकडे मोठा कल आहे. पुण्यातील एका बिल्डरने सांगितले की, कोथरूड, सिंहगड रोड, सातारा रोड, बाणेर रोड आदी भागात गोव्यातील लोकांचा सदनिका खरेदी करण्याचा कल जास्त आहे. कारण या ठिकाणहून गोव्यात येण्यासाठी लवकर एक्झीट मिळते. गोव्यातील अनेक लोक पुण्यामध्ये प्रॉपर्टीत गुंतवणूक करू लागले आहेत. तसेच सिंधुदुर्ग कोल्हापूर या ठिकाणचे पालकही पुण्यात घर किंवा सदनिका शोधत असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले.

तसेच मुले दहावी- बारावीत पोचण्याआधीच पुण्यात घर खरेदीसाठी चौकशी सुरू होते. पालकांना साधारणपणे बुकिंग केल्यानंतर दोन वर्षांत घराचा किंवा सदनिकचा ताबा हवा असतो अनेकजण हिंजेवाडी,खराडी आधी आयटी परिसराची निवड करतात. उच्च शिक्षणासाठी किंवा वैद्यकीय उपचारांसाठी पुण्यात येणाऱ्यांची संख्या मोठी आहे . साधारणपणे प्रत्येक महिन्याला 12000 कुटुंबे पुण्यात स्थलांतरित होत असल्याचे समोर आले आहे.पुण्यात आयटी तसेच ऑटोमोबाइल क्षेत्रात भरपूर वाव आहे येथे उच्च शिक्षण घेतल्यानंतर मुले नोकरी-व्यवसायासाठी पुण्यातच स्थायिक होतात त्यांच्यासाठी पालक गुंतवणुकीची तयारी करतात. सर्वेक्षणामध्ये गोव्यात उच्च शिक्षणाच्या बाबतीत मुलींचे प्रमाण कमी दिसण्याचे हेही एक कारण असू शकते असे मत काही जणांनी व्यक्त केले.

टॅग्स :goaगोवाEducationशिक्षण