शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जीसीए प्रकरण न्यायालयात

By admin | Updated: June 19, 2015 01:36 IST

पणजी : डॉ. शेखर साळकर यांनी गोवा क्रिकेट असोसिएशनची निवडणूक जिंकण्यासाठी ६४ क्लबांचा मतदानाचा हक्क काढून घेण्याच्या अरेरावीच्या कृत्याविरुद्ध

पणजी : डॉ. शेखर साळकर यांनी गोवा क्रिकेट असोसिएशनची निवडणूक जिंकण्यासाठी ६४ क्लबांचा मतदानाचा हक्क काढून घेण्याच्या अरेरावीच्या कृत्याविरुद्ध गावोगावच्या क्रिकेट संघांमध्ये तीव्र असंतोषाचे वातावरण निर्माण झाले असून जलस्रोतमंत्री दयानंद मांद्रेकर यांनी साळकरांविरुद्ध उघड पावित्रा घेतला, तर ५० क्लबांनी उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. बुधवारी गोव्यातील बऱ्याच क्लबांच्या सदस्यांनी पर्वरी येथील जीसीएच्या कार्यालयात घुसून अध्यक्ष शेखर साळकर यांना घेराव घातला होता. सूत्रांनी सांगितले की, ८२ क्लबांनी आता साळकर यांच्या विरोधात कडक पावित्रा घेत त्यांनी बनावट सह्या करून ज्या अधिकृत सदस्यांना हटवून त्यांच्या जागी बनावट सदस्य आणले आहेत, त्यांच्या विरोधात गावागावांत निदर्शने करण्याचा निर्णय घेतला आहे. डॉ. साळकर यांचे इस्पितळ व निवासस्थानीही ते निदर्शने करतील, असा इशारा देण्यात आला आहे. जलस्रोतमंत्री दयानंद मांद्रेकर यांनी तर आज डॉ. शेखर साळकर यांच्या कार्यपद्धतीविरुद्ध जोरदार रोष व्यक्त केला. ते म्हणाले : मला पक्षीय भूमिका काय आहे याच्याशी सोयरसुतक नाही; परंतु जीसीएचा कारभार सुधारला पाहिजे. बनावट सदस्य नोंदवून त्यांच्याकडून मतदान करून घ्यायचा डाव कोणत्याही परिस्थितीत यशस्वी होता कामा नये. मांद्रेकर यांचा स्वत:चा शिवोली येथील क्लबही डॉ. शेखर साळकर यांच्या निर्णयामुळे मांद्रेकर यांच्या हातातून निसटला आहे. त्या क्लबचा मतदानाचा हक्क एका ‘लामाणी’ नावाच्या माणसाला मिळाला आहे. त्यामुळे मांद्रेकर संतप्त बनले आहेत. सदस्यांच्या मते, बऱ्याच क्लबांचे अध्यक्ष व सचिव यांच्या बनावट सह्या वापरून मतदानास डॉ. साळकर यांनी आपल्या मर्जीतील माणसे घुसविली आहेत. दुसऱ्या बाजूला, किमान ५० क्लबांनी डॉ. साळकर यांच्या कार्यपद्धतीला व निवडणुकीतील गोंधळाला उच्च न्यायालयात आज आव्हान दिले. हा अर्ज सोमवारी सुनावणीस येईल. डॉ. साळकरांनी आपल्यालाच मतदान व्हावे यासाठी ठरावीक लोकांनाच मतदानाचा अधिकार दिला व बऱ्याच क्लबांची मान्यता रद्द केली, असा दावा त्यात करण्यात आला आहे.(विशेष प्रतिनिधी) जीसीएतील कलगीतुरा संपेना/२