गोव्यातील भूमाफियांविषयी प्रथमच आमदारांमध्ये चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2020 12:42 PM2020-01-21T12:42:04+5:302020-01-21T12:43:10+5:30

पणजी : गोव्यातील भूमाफियांविषयी सहसा आमदार, मंत्री आदी घटकांमध्ये चर्चा होत नव्हती पण प्रकाश नाईक नावाचा एक माजी सरपंच ...

For the first time, discussions among MLAs about landmines in Goa | गोव्यातील भूमाफियांविषयी प्रथमच आमदारांमध्ये चर्चा

गोव्यातील भूमाफियांविषयी प्रथमच आमदारांमध्ये चर्चा

Next

पणजी : गोव्यातील भूमाफियांविषयी सहसा आमदार, मंत्री आदी घटकांमध्ये चर्चा होत नव्हती पण प्रकाश नाईक नावाचा एक माजी सरपंच तथा विद्यमान पंच याने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्त्या केल्याने भूमाफियांचा विषय चर्चेत आला आहे. गोव्याचे एक ज्येष्ठ आमदार तथा माजी बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांनी तर गोव्यात काही आमदार देखील भूमाफियांच्या दबावाखाली येत असल्याचा आरोप करून चर्चेला वेग दिला आहे.

गोव्यात मोपा येथे नवा आंतरराष्ट्रीय विमानतळ उभा राहत आहे. या विमानतळाच्या परिसरात अनेक राजकारणी, रियल इस्टेट व्यवसायिक, काही कसिनो व्यवसायिक आदींनी जमिनी विकत घेऊन ठेवल्या आहेत. त्या जमिनींचे रुपांतरण करून घेण्याचा विविध घटकांचा प्रयत्न आहे. मोपा येथे विमानतळ बांधायला हवा असा निर्णय साधारणत: 2000 साली झाला. ढवळीकर यांनी जाहीरपणो बोलताना हा संदर्भ दिला व कितीजणांनी 2000 सालानंतर जमिनी खरेदी केल्या याची यादी सरकारने जाहीर करावी अशी मागणी केली.

गोव्यात नगर नियोजन खाते, त्या खात्याशीसंबंधित काही व्यवहार आणि गोव्यातील भूमाफिया हा विषय कायम नाजूक असा मानला गेला. सरकारे घडविताना काही मंत्री आपल्याला नगर नियोजन खाते मिळायला हवे असा हट्ट धरतात. मार्च 2017 मध्ये र्पीकर सरकार अधिकारावर आल्यानंतरच्या काळात गोव्यात टीसीपी कायदा दुरुस्त केला गेला. चाळीस लाख चौरस मीटर क्षेत्रफळापैकी बरीच जमीन त्यावेळी रुपांतरित केली गेली. प्रकाश नाईक याने 2017 साली मगो पक्षाच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. त्याने नंतर मगोपवर टीका करत पक्ष सोडला. ढवळीकर यांनी नाईक याच्या राजीनाम्याविषयी आता प्रश्न उपस्थित केला व त्याचा भूमाफियांनी खूनच केला असा आरोप केला.

गोव्यात काँग्रेसमधून बारा आमदार भाजपमध्ये गेले. त्यांनाही काहीजणांनी जमिनींचे रुपांतरण करून देण्याचे आश्वासन दिले होते, असे ढवळीकर म्हणाले. प्रकाश नाईक याने मगोप सोडला तेव्हा त्यालाही जमिनीचे रुपांतरण करून देण्याचे आश्वासन दिले गेले होते काय अशी विचारणा ढवळीकर यांनी केली व सर्व दृष्टीकोनांतून चौकशी व्हावी अशी मागणी केली.

दरम्यान, नाईक याने गेल्या शनिवारी स्वत:वर गोळी झाडून घेतली. त्याचा मृत्यू झाला पण त्याने मृत्यूपूर्वी मोबाईलद्वारे कुटूंबियांना मॅसेज पाठवला होता. त्यात त्याने दोघा भूमाफियांची नावे समाविष्ट केली व या दोघांनी आपल्याला मरण्यास प्रवृत्त केल्याचे म्हटले आहे. पोलिसांनी विल्सन गुदिन्हो व अन्य एकाविरुद्ध या प्रकरणी गुन्हा नोंद केला. विल्सन हा गोव्याचे पंचायत मंत्री माविन गुदिन्हो याचा बंधू आहे. तो जमिन- खरेदी विक्रीच्या व्यवहारांत आहे. त्याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. चौकशी निपक्षपाती होण्यासाठी माविन गुदिन्हो यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी ढवळीकर, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर व गोवा फॉरवर्ड पक्षाने केली आहे.

Web Title: For the first time, discussions among MLAs about landmines in Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा