बापाने भोगले, आईने विकले..!

By Admin | Updated: June 11, 2015 01:01 IST2015-06-11T01:01:06+5:302015-06-11T01:01:59+5:30

पणजी : सावत्र बापाने लैंगिक अत्याचार केले आणि सख्ख्या आईने पोरींना विकून टाकले, ही दुर्दैवी कहाणी आहे बायणा- वास्को येथील सहा अल्पवयीन मुलींची. पोलिसांनी बाप व आई या दोघाही संशयितांना अटक केली आहे.

Father was hurt, mother sold ..! | बापाने भोगले, आईने विकले..!

बापाने भोगले, आईने विकले..!

पणजी : सावत्र बापाने लैंगिक अत्याचार केले आणि सख्ख्या आईने पोरींना विकून टाकले, ही दुर्दैवी कहाणी आहे बायणा- वास्को येथील सहा अल्पवयीन मुलींची. पोलिसांनी बाप व आई या दोघाही संशयितांना अटक केली आहे.
जन्मदात्री आई व सावत्र बापाच्या अत्याचाराला बळी पडलेल्या मुलींत एक १४ वर्षांची, एक ११ वर्षांची, एक ६ वर्षांची व तीन त्यापेक्षाही लहान आहेत. कोवळ्या मुलींची बदनामी होईल, या भीतीने पोलिसांनी क्रूर पित्याचे आणि त्या कुमातेचे नाव उघड केले नाही. या प्रकरणात पणजी महिला पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आल्यानंतर बापाला लैंगिक अत्याचर, बलात्कार व मानवी तस्करीच्या गुन्ह्याखाली, तर महिलेला मानवी तस्करीच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली. (प्रतिनिधी)

Web Title: Father was hurt, mother sold ..!