शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
4
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
5
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
6
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
7
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
8
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
9
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
10
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
11
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
12
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
13
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
14
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
15
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
16
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
17
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
18
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
19
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
20
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

दिवसाढवळ्या फ्लॅट फोडून चोरट्यांने केला हात साफ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2020 22:17 IST

फ्लॅटमधील कपाट फोडून आत ठेवलेली ३५ हजारांची रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी केली लंपास

वास्को: दिवसाढवळ््या वास्कोत असलेल्या ‘कर्मा एंम्प्रेस’ इमारतीच्या पहील्या मजल्यावर असलेल्या फ्लॅट चे कुलूप फोडून अज्ञात चोरट्यांनी आत असलेली ३५ हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केली. या फ्लॅट मध्ये राहणारी रश्मी आमोरीन रविवारी (दि.१९) दुपारी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या मुलांसहीत घरातून गेल्यानंतर संध्याकाळी ६.३० च्या सुमारास परतली असता तिच्या फ्लॅटमध्ये चोरी झाल्याचे उघड झाले. वास्को पोलीसांना या चोरीची माहीती मिळताच त्यांनी श्वान पथक तसेच ठसे तज्ञांच्या मदतीने येथे रात्रीच्या वेळी पंचनामा केला.

वास्को पोलीसांनी दिलेल्या माहीतीनुसार रविवारी दुपारी १.३० ते संध्याकाळी ६.३० च्या दरम्यान सदर चोरीचा प्रकार घडला. वास्कोत असलेल्या ‘कर्मा एंम्प्रेस’ इमारतीच्या पहील्या मजल्यावर राहणारी रश्मी आमोरीन व त्याची मुले एका कार्यक्रमासाठी गेली होती. यानंतर पुन्हा ती आपल्या मुलांसहीत घरी परतली असता तिच्या फ्लॅटच्या मुख्य दरवाजाचे कुलूप अज्ञातांनी फोडून आत प्रवेश केल्याचे तिला आढळून आले. यानंतर तीने आत तपासणी केली असता घरात असलेले कपाट चोरट्यांनी फोडून आत ठेवलेली ३५ हजाराची रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याचे आढळून आले. सदर प्रकरणाबाबत नंतर तीने पोलीसांना माहीती दिली. पोलीसांनी त्वरित घटनास्थळावर श्वान पथक तसेच ठसे तज्ञांच्या मदतीने पंचनामा केला. रश्मी हीच्या घरात काही सोन्याचे ऐवज होते, मात्र ते चोरट्यांच्या नजरेस आले नसल्याने सुदैवाने सदर ऐवज चोरी होण्यापासून वाचल्याची माहीती पोलीस सूत्रांनी दिली. वास्कोत काही काळानंतर पुन्हा एकदा दिवसा ढवळ्या चोरी होण्याचा प्रकार घडल्याने याबाबत नागरीकात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. वास्को पोलीस सदर चोरी प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :goaगोवाThiefचोर