शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचाही जि. पं. निवडणुकीवर बहिष्कार

By admin | Updated: February 24, 2015 03:05 IST

पणजी : जिल्हा पंचायत निवडणुका पक्षीय पातळीवर होणार असल्या, तरी राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेला काँग्रेस

पणजी : जिल्हा पंचायत निवडणुका पक्षीय पातळीवर होणार असल्या, तरी राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेला काँग्रेस पक्ष या निवडणुकीत उतरणार नाही. निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणुकीवर बहिष्कार टाकत असल्याचे जाहीर केले आहे. प्रदेश काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक सोमवारी सकाळी झाली. या बैठकीत जिल्हा पंचायतीच्या निवडणुकीविषयी चर्चा करण्यात आली. निवडणुकीत पक्ष म्हणून न उतरण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती काँग्रेसचे सरचिटणीस यतीश नाईक यांनी दिली. त्यामुळे काँग्रेसचे चिन्ह या निवडणुकीत दिसणार नाही, हे निश्चित आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निवडणुकीत न उतरण्याचा निर्णय या पूर्वीच जाहीर केला आहे, तर दुसरीकडे भाजप-मगो युती करण्याच्या हालचाली सुरू आहेत. तशी युती झाल्यास या निवडणुकीत युतीला कुठल्याही पक्षाचे आव्हान उरणार नाही. प्रदेश काँग्रेस कार्यकारिणीची बैठक सोमवारी प्रदेशाध्यक्ष लुईझिन फालेरो यांच्या अध्यक्षतेखाली झाली. विरोधी पक्षनेते प्रतापसिंह राणे आणि इतर पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. दोन तास चाललेल्या चर्चेत बहुतेक सदस्यांनी निवडणूक न लढविणे योग्य होणार असल्याची मते व्यक्त केली. जिल्हा पंचायत मतदारसंघांची नव्याने करण्यात आलेली फेररचना भाजपला सोयीस्कर असल्यामुळे या निवडणुकीत काँग्रेसला मोठ्या प्रमाणावर फटका बसण्याची शक्यता अनेकांनी व्यक्त केली. निवडणुकीचे निकाल विपरीत लागल्यास पक्षाची नाचक्की होईल, अशी भीतीही काही सदस्यांनी व्यक्त केली. काँग्रेस पक्ष निवडणुका लढविणार नसला, तरी भाजप उमेदवाराच्या विरोधात चांगल्या उमेदवाराला पाठिंबा देणार असल्याचे नाईक यांनी सांगितले. चांगले उमेदवार कधी ठरविणार, असे विचारले असता, नामांकने दाखल झाल्यानंतर रिंगणात उतरलेल्या उमेदवारांपैकीच ते ठरविणार असल्याचे ते म्हणाले. या वेळी माजी आमदार आग्नेल फर्नांडिस आणि सरचिटणीस सुनील कवठणकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)