शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

भाजप आमदारांचा, मंत्र्यांचा कार्निव्हल

By admin | Updated: June 13, 2014 07:04 IST

पणजी : साध्या साध्या गोष्टींवरून काँग्रेस पक्षावर उठसूठ टीकेची झोड उठविणाऱ्या मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आज कोलांटउडी मारली.

पणजी : साध्या साध्या गोष्टींवरून काँग्रेस पक्षावर उठसूठ टीकेची झोड उठविणाऱ्या मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आज कोलांटउडी मारली. त्यांच्या कृपेने सहा आमदार आणि मंत्री ब्राझीलमध्ये कार्निव्हल साजरा करणार आहेत. राज्याच्या भंडारात खडखडाट असताना आमदार आणि मंत्री मात्र ब्राझीलमध्ये जिवाचा गोवा करण्यास जाणार आहेत. यास विरोधकांनी जोरदार आक्षेप घेतला असला तरी पर्रीकर मात्र भाजप आमदारांचे, मंत्र्यांचे समर्थन करत होते. क्रीडामंत्री रमेश तवडकर यांच्यासह या दौऱ्यात मच्छीमारमंत्री आवेर्तीन फुर्तादो, वीजमंत्री मिलिंद नाईक, आमदार कार्लुस आल्मेदा, आमदार कायतान सिल्वा व आमदार ग्लेन टिकलो सहभागी होणार आहेत. या सहाजणांना अभ्यास दौऱ्याच्या गोंडस नावाखाली सरकारी खर्चातून फुटबॉल सामने पाहण्यासाठी ब्राझीलला पाठवण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यास प्रदेश काँग्रेसने जोरदार विरोध केला आहे. सरकारी तिजोरीतून ८९ लाख रुपयांच्या उधळपट्टीला हरकत घेताना काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते दुर्गादास कामत यांनी जनतेच्या पैशांचा हा निव्वळ अपव्यय असल्याचे म्हटले आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेच्या पैशांची उधळपट्टी करू नका, असा सल्ला देत आहेत तर दुसरीकडे भाजपचेच सरकार येथे सरकारी तिजोरीचा आपल्याला हवा तसा वापर करीत आहे, अशी टीका त्यांनी केली आहे. सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या शिष्टमंडळात फक्त आमदारांचाच समावेश असून अधिकाऱ्यांचा समावेश केलेला नाही. चालू महिन्याच्या अखेरीस या सहाजणांचा दौरा आयोजिला आहे. फुटबॉल क्षेत्रातील प्रतिष्ठेचा अर्जुन पुरस्कार विजेते ब्रह्मानंद शंखवाळकर व ब्रुनो कुतिन्हो या दोघांनी ब्राझीलला जाण्याची इच्छा दर्शविली होती; परंतु त्यांचा या शिष्टमंडळात समावेश केलेला नाही. गोव्यातील फुटबॉलप्रेम सर्वज्ञात आहे. या विश्वचषक स्पर्धेची अंतिम फेरी १३ जुलै रोजी ब्राझीलमध्ये रियो येथे होणार आहे. कामत पुढे म्हणतात की, प्रादेशिक आराखडा, कॅसिनो, बेकायदा खाणींच्या प्रश्नावर २0१२च्या विधानसभा निवडणुकीत पर्रीकरांनी आश्वासने दिली होती, त्या प्रत्येक बाबतीत शब्द फिरवला. जनतेचा पैशांची उधळपट्टी न करण्याच्या आश्वासनावरही त्यांनी ‘यू टर्न’ घेतला. फुटबॉलची जाण असलेल्या व या क्षेत्रातील तीन तज्ज्ञांना पाठवले असते तर समजता येण्यासारखे होते. मात्र, सरकारने अर्जुन पुरस्कार विजेत्यांनाही डावलले. एकीकडे उपमुख्यमंत्री राज्य आर्थिक अडचणीत असल्याचे सांगतात, दुसरीकडे सरकारच अशी उधळपट्टी करते. (प्रतिनिधी)