अनुरा प्रभुदेसाईला कांस्यपदक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2016 18:45 IST2016-06-21T18:45:07+5:302016-06-21T18:45:07+5:30

गोव्याची स्टार बॅडमिंटनपटू अनुरा प्रभुदेसाई हिने ज्युनिअर रँकिग बॅडमिंटन स्पर्धेत दुहेरी गटात कांस्यपदक पटकावले. ही स्पर्धा बंगळुरु येथे झाली. स्पर्धेत तिने पश्चिम

Anurah Prabhudesai's bronze medal | अनुरा प्रभुदेसाईला कांस्यपदक

अनुरा प्रभुदेसाईला कांस्यपदक

ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. 21 -  गोव्याची स्टार बॅडमिंटनपटू अनुरा प्रभुदेसाई हिने ज्युनिअर रँकिग बॅडमिंटन स्पर्धेत दुहेरी गटात कांस्यपदक पटकावले. ही स्पर्धा बंगळुरु येथे झाली. स्पर्धेत तिने पश्चिम बंगालच्या रिया मुखर्जीसोबत खेळताना ही कामगिरी केली.
स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकाचे मानांकन प्राप्त या जोडीने उपांत्यपूर्व फेरीत काव्या गांधी आणि खुशबू कुमार या जोडीचा २१-१७, २१-१४ ने पराभव केला. तसेच महिमा अगरवाल आणि शिखा गौतम या अव्वल मानांकित जोडीकडून उपांत्य सामन्यात त्यांना २१-१३, २१-१२ अशा फरकाने पराभूत व्हावे लागले.
(क्रीडा प्रतिनिधी)

Web Title: Anurah Prabhudesai's bronze medal