शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

देवी लईराईच्या जत्रोत्सवासाठी प्रशासन सज्ज; १८ रोजी करणार 'मॉक ड्रिल', नियमांची होणार काटेकार अंमलबजावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 07:55 IST

जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : शिरगाव येथील प्रसिद्ध देवी लहराई जत्रोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या पार्श्वभूमीवर गृह खाते व राज्य सरकारने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी योग्यरीत्या होत आहे का? याचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी अंकित यादव यांनी मंगळवारी दुपारी शिरगाव येथे प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी यादव यांनी सांगितले की, जत्रा परिसरात केवळ मर्यादित दुकानांना परवानगी देण्यात येणार असून, त्याचे काटेकोर पालन केले जाईल. मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहण्याची शक्यता लक्षात घेता, रस्त्यावर कोणतेही अडथळे निर्माण होऊ नयेत यासाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे.या पाहणीच्या वेळी देवस्थान समितीचे अध्यक्ष दीनानाथ गावकर, उपजिल्हाधिकारी शुभम नाईक, मामलेदार शैलेंद्र देसाई, उपअधीक्षक श्रीदेवी, पोलिस निरीक्षक विजय राणे-सरदेसाई तसेच अधिकारी उपस्थित होते. दरम्यान, गृह खात्याच्या आदेशानुसार जत्रा परिसरात कडक नियम लागू करण्यात आले आहेत. तसेच भाविक, धोंड यांच्यासाठी विशेष नियमावली तयार करण्यात आली आहे.

देवस्थान समितीचे अध्यक्ष दीनानाथ गावकर यांनी सांगितले की, सरकारने घालून दिलेल्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करण्यात येईल. जत्रोत्सवात मोठ्या संख्येने भाविकांनी सहभागी व्हावे, मात्र शिस्त पाळून आणि कोणतीही गडबड न करता दर्शन घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

गेल्या वर्षी घडलेल्या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर यंदा विशेष दक्षता घेतली जात आहे. त्या अनुषंगाने १८ एप्रिल रोजी रात्री प्रत्यक्ष 'मॉक ड्रिल' घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

भाविकांना नियोजनबद्ध पद्धतीने दर्शन घेता यावे यासाठी स्वतंत्र रांगा उभारण्यात येणार आहेत. तसेच पवित्र तळ्यात स्नान आणि होमकुंड दर्शनासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येत आहे. सर्वांनी नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.

भाविकांसाठी सूचना

जत्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गेल्या सहा महिन्यांपासून शासनस्तरावर सातत्याने बैठका घेऊन नियोजन करण्यात आले आहे. भाविकांनी शिस्त राखणे अत्यावश्यक आहे. कोणतीही धावपळ न करता, प्रशासनाने आखून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत दर्शन घ्यावे. सुरक्षेच्या दृष्टीने घालण्यात आलेल्या नियमांचे पालन केल्यास जत्रा सुरळीत व सुरक्षित पार पडण्यास मदत होईल, असा विश्वास देवस्थान समितीने व्यक्त केला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Administration Ready for Lairai Jatra; Mock Drill on 18th

Web Summary : Shirgaon's Lairai Jatra preparations are underway. Strict rules and a mock drill on April 18th ensure safety. Limited stalls, regulated queues, and adherence to guidelines are emphasized for smooth celebrations.
टॅग्स :goaगोवाIndian Festivalsभारतीय उत्सव-सण