लसीकरणासाठी सरसावला 30 वर्षांवरील युवावर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 05:00 AM2021-06-20T05:00:00+5:302021-06-20T05:00:27+5:30

मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून १८ ते ४४ वयाेगटासाठी लसीकरणाला सुरुवात झाली. त्याही वेळी या वयाेगटातील नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला हाेता. मात्र काही दिवसांतच या वयाेगटासाठी लसीकरण बंद करण्यात आले. त्यानंतर पुन्हा शनिवारपासून गडचिराेली जिल्ह्यात लसीकरणाला सुरुवात झाली आहे. मात्र १८ते ४४ हा वयाेगट न ठेवता, ३० ते ४४ हा वयाेगट ठेवण्यात आला आहे.

Youths above 30 years of age for vaccination | लसीकरणासाठी सरसावला 30 वर्षांवरील युवावर्ग

लसीकरणासाठी सरसावला 30 वर्षांवरील युवावर्ग

Next
ठळक मुद्देमाेजके केंद्र असूनही अनेकांचा पुढाकार, उद्यापासून सर्व केंद्रांवर सुविधा

लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली :  तब्बल दीड महिन्याच्या अंतरानंतर ४४ वयाेगटाखालील नागरिकांना  शनिवारपासून लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. गडचिराेली जिल्ह्यातील ३० ते ४४ हा वयाेगट ठरविण्यात आला आहे.  लसीकरणाच्या पहिल्याच दिवशी नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या वयाेगटातील सुमारे १ हजार ११० नागरिकांनी लस घेतली. 
मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून १८ ते ४४ वयाेगटासाठी लसीकरणाला सुरुवात झाली. त्याही वेळी या वयाेगटातील नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला हाेता. मात्र काही दिवसांतच या वयाेगटासाठी लसीकरण बंद करण्यात आले. त्यानंतर पुन्हा शनिवारपासून गडचिराेली जिल्ह्यात लसीकरणाला सुरुवात झाली आहे. मात्र १८ते ४४ हा वयाेगट न ठेवता, ३० ते ४४ हा वयाेगट ठेवण्यात आला आहे. शनिवारी जिल्ह्यातील निवडक केंद्रांवर लसीकरणाला सुरुवात झाली. तरीही नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला असल्याचे दिसून येत आहे. पहिल्याच दिवशी ३० ते ४४ या वयाेगटातील १ हजार ११० नागरिकांनी लस घेतली आहे. 

५० कोरोनामुक्त तर १६ कोरोना बाधित

जिल्हयात शनिवारी १६ नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच तर ५० जणांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत ३० हजार ५४ जणांना काेराेनाची बाधा झाली आहे. त्यापैकी २९ हजार ९४ जणांनी काेराेनावर मात केली आहे. सद्या २२३ सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत एकूण ७३७ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.८१ टक्के, सक्रिय रुग्णांचे प्रमाण ०.७४ टक्के तर मृत्युदर ४.४५ टक्के झाला. नवीन १६ बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील १०, चामोर्शी तालुक्यातील १, कुरखेडा तालुक्यातील १, मुलचेरा तालुक्यातील १, सिरोंचा तालुक्यातील २ तर देसाईगंज तालुक्यातील १ जणाचा समावेश आहे. कोरोनामुक्त झालेल्या ५० रुग्णांमध्ये गडचिरोली मधील १८, अहेरी ६, भामरागड ७ , चामोर्शी १३, मुलचेरा १, सिरोंचा १, देसाईगंज येथील ४ जणांचा समावेश आहे.

आज झालेले लसीकरण
देचलीपेठा १६, जिमलगट्टा १०, कमलापूर ९४, महागाव २१, देलनवाडी ८०, वैरागड  १०३, भेंडाळा  २११, कुनघाडा  ११, मार्कंडा  १६१, कारवाफा २०, अमिर्झा  १०, पाेटेगाव ९, मालेवाडा २५, कुरखेडा ७६, अंकिसा ११, काेरेगाव ५२, बाेदली ४०, देऊळगाव ३२८, गाेडलवाही १०, काेरची ७८, रेगडी ३०, सुंदरनगर ३९, वडसा १२०, जिल्हा रुग्णालय ९९, आरमाेरी ६४, चामाेर्शी १०६, अहेरी ४३, मुलचेरा १, सिराेंचा ३२, जीएनएम हाेस्टेल ९, वडधा २२०, रांगी २९, कुरूड ४३, पेंढरी २१, महिला रुग्णालय १२, सावंगी २८, गाेकुलनगर ४८, शेगाव २०, कन्यका मंदिर २० एवढे लसीकरण झाले आहे.

ग्रामपंचायत सदस्यांनी स्वत: लस घ्यावी
- गावाचे नेतृत्व ग्रामपंचायत सदस्य करतात. मात्र या वर्षीच्या निवडणुकीत निवडून आलेले बहुतांश सदस्य ४४ वयाेगटाच्या खालील असल्याने ते लस घेऊ शकत नव्हते. आता मात्र या वर्गाला आता लस उपलब्ध हाेणार आहे. 
- ग्रामपंचायत सदस्यांनी स्वत: लस घेऊन नागरिकांना लस घेण्याविषयी प्रवृत्त केल्यास गावातील नागरिक त्यांचे अनुकरण करून लस घेतील. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी लस घेण्याची गरज आहे. यामुळे ग्रामीण भागातील लसीकरणाला वेग येऊ शकताे.
 

 

Web Title: Youths above 30 years of age for vaccination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.