शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हाइट हाऊस गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
3
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
4
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
5
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
6
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
8
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
9
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
10
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
11
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
13
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
14
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
15
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
16
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
17
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
18
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
19
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
20
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

तरुणाईने रॅलीतून घडविले भारतीय संस्कृतीचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2019 06:00 IST

गोंडवाना विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.एन. व्ही. कल्याणकर यांनी हिरवी झेंडी दाखवून रॅलीचा शुभारंभ केला. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. चंद्रशेखर भुसारी, कुलसचिव डॉ. ईश्वर मोहुर्ले यांच्यासह विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणाचे सदस्य, प्राचार्य, प्राध्यापक उपस्थित होते. सदर रॅली एमआयडीसी मार्गावरील विद्यापीठाच्या प्रवेशद्वारापासून जिल्हा न्यायालय ते चंद्रपूर मार्गावरून जिल्हाधिकारी कार्यालय ते जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय ते टी पार्इंट अशी फिरविण्यात आली.

ठळक मुद्देकॉम्प्लेक्स परिसरात रॅली : पर्यावरण व मानवी सुरक्षिततेचे आवाहन करणारे देखावे

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ युवा महोत्सवाच्या निमित्ताने सोमवारी (दि.२) कॉम्प्लेक्स परिसरात महाविद्यालयीन युवक, युवती व विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली. या रॅलीत विविध प्रकारचे पथनाट्य, फलकाच्या माध्यमातून तसेच घोषणाबाजी करून तरुणाईने भारतीय आणि महाराष्ट्रीय संस्कृतीचे दर्शन घडविले. याशिवाय पर्यावरण व मानवी सुरक्षितता टिकली पाहिजे, असे आवाहनही केले. या रॅलीत राज्यभरातील ७०० पेक्षा जास्त महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी झाले होते.गोंडवाना विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.एन. व्ही. कल्याणकर यांनी हिरवी झेंडी दाखवून रॅलीचा शुभारंभ केला. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. चंद्रशेखर भुसारी, कुलसचिव डॉ. ईश्वर मोहुर्ले यांच्यासह विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणाचे सदस्य, प्राचार्य, प्राध्यापक उपस्थित होते. सदर रॅली एमआयडीसी मार्गावरील विद्यापीठाच्या प्रवेशद्वारापासून जिल्हा न्यायालय ते चंद्रपूर मार्गावरून जिल्हाधिकारी कार्यालय ते जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय ते टी पार्इंट अशी फिरविण्यात आली. येथून रॅली पुन्हा विद्यापीठात पोहोचली. सदर रॅलीमध्ये गोंडवाना विद्यापीठांतर्गत महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या विद्यार्थ्यांनी आदिवासी क्रांतीकारकांच्या इतिहासाबद्दल बॅनर व फलकाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती केली. तसेच रेलानृत्य सादर करून आदिवासी संस्कृतीची ओळख करून दिली. इतर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी जंगल वाचवा, प्राणी वाचवा असा संदेश पथनाट्यातून दिला. मराठवाडा विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी महिला व युवतीवरील अत्याचार थांबले पाहिजे, असे आवाहन फलकातून केले. नुकत्याच हैदराबाद येथे घडलेल्या डॉ.प्रियंका रेड्डी यांच्यावरील अत्याचाराच्या घटनेचा निषेधही विद्यार्थ्यांनी केला. अशा प्रकारच्या घटनांना आळा घातल्या गेला पाहिजे, असे आवाहन केले. दरम्यान रॅलीत काही विद्यार्थी ‘मुली वाचवा, अत्याचार थांबवा’ ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ असा संदेश फलकातून दिला. सदर रॅलीतून विद्यार्थ्यांनी आदिवासी, महाराष्ट्रीय संस्कृतीचे दर्शन घडविले.

टॅग्स :cultureसांस्कृतिकuniversityविद्यापीठ