शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
5
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
6
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
7
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
8
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
9
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
10
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
11
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
12
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
13
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
14
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
15
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
16
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
17
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
18
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
19
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
20
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
Daily Top 2Weekly Top 5

रखडलेली कामे मार्गी लावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2020 06:00 IST

अहेरीपासून राजकीय कारकिर्दीचे सुरूवात केल्यानंतर मिनी मंत्रालय समजल्या जाणाºया जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अशा चढत्या राजकीय आलेखामुळे अजय कंकडालवार यांनी जिल्ह्याच्या राजकीय पटलावर आपला वेगळा ठसा उमटविला आहे. गेली अडीच वर्षे जि.प.चे उपाध्यक्षपद सांभाळताना त्यांच्या कामाला मर्यादा होत्या. पण आता अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर त्यांच्या कामकाजाची दिशा ‘लोकमत’ने जाणून घेतली.

ठळक मुद्देलोकमत मुलाखत : नवीन जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्षांकडून गतिमान कामकाजाचे सुतोवाच

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्हा परिषदेच्या अखत्यारित येणाऱ्या आरोग्य, शिक्षण, पाणी पुरवठा, कृषी आदी विभागांमधील कामांना गती देण्यासोबतच समाजकल्याण विभागाचा ढेपाळलेला कारभार वठणीवर आणून कामांना गती देण्याचा निश्चय नवनिर्वाचित जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार आणि उपाध्यक्ष मनोहर पोरेटी यांनी व्यक्त केला. पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच ते ‘लोकमत’शी बोलत होते.अहेरीपासून राजकीय कारकिर्दीचे सुरूवात केल्यानंतर मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अशा चढत्या राजकीय आलेखामुळे अजय कंकडालवार यांनी जिल्ह्याच्या राजकीय पटलावर आपला वेगळा ठसा उमटविला आहे. गेली अडीच वर्षे जि.प.चे उपाध्यक्षपद सांभाळताना त्यांच्या कामाला मर्यादा होत्या. पण आता अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर त्यांच्या कामकाजाची दिशा ‘लोकमत’ने जाणून घेतली. यावेळी उपाध्यक्ष मनोहर पोरेटी यांनीही त्यांच्या सुरात सूर मिसळून दोन्ही पदाधिकारी एकदिलाने काम करणार असल्याचा संदेश दिला.ग्रामीण भागात अनेक ठिकाणी शुद्ध पाण्याचा पुरवठा होत नाही. काही ठिकाणी नुसत्याच टाक्या उभ्या आहेत. पाणी पुरवठा योजना बंद आहे त्या मार्गी लावल्या जातील. १३ ते १४ नवीन आरोग्य उपकेंद्रांना मंजुरी मिळविण्याचा प्रयत्न आहे. आरोग्य केंद्रांच्या इमारतींसह शाळेच्या वर्गखोल्यांचे बांधकाम केले जाणार आहे. शिक्षकांच्या रिक्त पदांचा फटका जि.प.शाळांना बसत असल्याचे कंकडालवार म्हणाले. शिक्षकांच्या पदभरतीसाठी आणि विविध कामांच्या निधीसाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे दोन्ही पदाधिकाऱ्यांनी सांगितले.आलापल्लीत होणार क्रीडा संमेलनगेल्या दोन वर्षांपासून काही पदाधिकाऱ्यांच्या आडमुठेपणामुळे होऊ न शकलेले शालेय विद्यार्थ्यांचे जिल्हा क्रीडा संमेलन यावर्षी नक्की होणार असून ते आलापल्लीत घेतले जाईल, असे अजय कंकडालवार यांनी सांगितले. गेल्या दोन वर्षात शिक्षण समितीने क्रीडा संमेलन घेण्याचा ठराव घेतल्यानंतरही तत्कालीन अध्यक्षांनी हे संमेलन होऊ दिले नाही. त्यात खेळाडू विद्यार्थ्यांचीही कुचंबना झाली. पण आता असे होणार नसल्याचे ते म्हणाले. विशेष म्हणजे यासंदर्भात आजच ठराव घेत असल्याची माहिती उपाध्यक्ष मनोहर पोरेटी यांनी दिली.

टॅग्स :zpजिल्हा परिषद