शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
4
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
5
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
6
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
7
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
8
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
9
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
10
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
11
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
13
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
14
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
15
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
16
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
17
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
18
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
19
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
20
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
Daily Top 2Weekly Top 5

इथे केव्हा उजाडणार? सात गावांचा भार सांभाळतेय एक आरोग्यसेविका; गडचिरोलीतले वास्तव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 11:14 IST

Gadchiroli News मुलचेरा तालुक्यातील कोपरअली येथील आरोग्य उपकेंद्र गेल्या तीन वर्षांपासून कंत्राटी आरोग्य सेविकेच्या भरवशावर सुरू असून, येथे स्थायी स्वरुपातील आरोग्य सेविकेचे पद भरण्याची मागणी होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली: मुलचेरा तालुक्यातील कोपरअली येथील आरोग्य उपकेंद्र गेल्या तीन वर्षांपासून कंत्राटी आरोग्य सेविकेच्या भरवशावर सुरू असून, येथे स्थायी स्वरुपातील आरोग्य सेविकेचे पद भरण्याची मागणी होत आहे.तालुक्यातील सुंदरनगर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या कोपरअली येथील आरोग्य उपकेंद्रात कोपरअल्ली (चेक), कोपरअल्ली (माल), अंबेला, लभानतांडा, विश्वनाथनगर, रेंगेवाही, लोहारा ही सात गावे येतात. प्रत्येक आरोग्य उपकेंद्रात स्थायी आरोग्यसेविका व कंत्राटी आरोग्यसेविका असते. मात्र, कोपरअल्ली येथील आरोग्य सेविकेचे पद ३ वर्षांपासून रिक्त आहे. प्रशासनाला याबाबत अनेकदा निवदने देऊनही आरोग्यसेविकेचे पद भरण्यात आले नाही.

एकट्या कंत्राटी आरोग्यसेविकेवर सात गावांचा भार असून, लसीकरण, कार्यालयीन मिटिंग, रुग्ण, प्रसुती अशी विविध कामे एकट्या आरोग्य सेविकेला पार पाडावी लागतात. त्यामुळे आरोग्य सेवेचा लाभ प्रत्येक रुग्णाला मिळत नाही. ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाने कोपरअली येथील आरोग्य उपकेंद्रात स्थायी आरोग्यसेविकेचे रिक्त पद तत्काळ भरावे, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :Healthआरोग्य