शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
4
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
5
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
6
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
7
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
8
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
9
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
10
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
11
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
12
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
13
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
14
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
15
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
16
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
17
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
18
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
19
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
20
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

काेट्यवधी रुपयांच्या या बेवारस वाहनांचे कारायचे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2022 05:00 IST

ज्या वाहनामुळे अपघात हाेऊन एखाद्या व्यक्तीचा जीव गेला असल्यास सदर वाहन अपशकून मानल्या जाते. त्या वाहनामुळे अपघाताची आठवण हाेत असल्याने नागरिक सदर वाहन घरी घेऊन जाण्यास तयार हाेत नाही. तसेच कधी कधी वाहन माेठ्या प्रमाणात क्षतिग्रस्त झाल्याने ते दुरुस्त करण्यास माेठा खर्च येत असल्याने वाहन परत नेले जात नाही.

लाेकमत न्यूज नेटवर्क गडचिराेली : वाहनाने एखादा अपघात किंवा गुन्हा घडल्यानंतर पाेलीस सदर वाहन जप्त करतात. वाहनाची कागदपत्रे सादर केल्यानंतर संबंधित मालकाला वाहन घरी परत नेता येते. मात्र बहुतांश वाहनमालक अपघात झालेले वाहन घरी परत नेत नाही. परिणामी पाेलीस स्टेशनच्या आवारांमध्ये काेट्यवधी रुपयांची शेकडाे वाहने पडून आहेत. या वाहनांमुळे पाेलीस स्टेशनला जागा अपुरी पडत असल्याने या वाहनांचे करायचे काय, असा प्रश्न पाेलिसांसमाेर निर्माण हाेत आहे. गुन्हा घडल्यानंतर संबंधित वाहन नेमके कुणाच्या मालकीचे आहे, त्या वाहनाचा विमा काढला आहे काय, पीयूसी आहे काय, या सर्व बाबी आरटीओ कार्यालयामार्फत तपासल्या जातात. या सर्व बाबी तपासल्यानंतर वाहन संबंधित मालक परत नेऊ  शकते. 

 बहुतांश वाहने झाली भंगार गडचिराेली पाेलीस स्टेशनमध्ये मागील आठ वर्षांपासूनची वाहने पडून आहेत. आठ वर्षे ऊन व पावसामुळे ही वाहने भंगार झाली आहेत. मशीन गंजल्या आहेत. गडचिराेली पाेलीस स्टेशनमध्ये जवळपास २०० वाहने आहेत. ही वाहने आता भंगारात विकल्याशिवाय पर्याय नाही. 

या वाहनांनी व्यापली पाेलीस स्टेशनची जागाक्षतिग्रस्त वाहने पाेलीस स्टेशनमध्ये पडून आहेत. या वाहनांनी जागा व्यापली असल्याने पाेलीस स्टेशनला जागा कमी पडत आहे. त्यामुळे या वाहनांचे काय करावे, असा माेठा प्रश्न पाेलिसांसमाेर पडला आहे. 

वाहनाबद्दल चुकीची समजूतज्या वाहनामुळे अपघात हाेऊन एखाद्या व्यक्तीचा जीव गेला असल्यास सदर वाहन अपशकून मानल्या जाते. त्या वाहनामुळे अपघाताची आठवण हाेत असल्याने नागरिक सदर वाहन घरी घेऊन जाण्यास तयार हाेत नाही. तसेच कधी कधी वाहन माेठ्या प्रमाणात क्षतिग्रस्त झाल्याने ते दुरुस्त करण्यास माेठा खर्च येत असल्याने वाहन परत नेले जात नाही.

अपघातांचे प्रमाण वाढले-   वाहनांची संख्या वाढण्याबराेबरच अपघातांचे प्रमाणसुद्धा वाढले आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने विमा काढणे आवश्यक आहे. किमान थर्डपार्टी विमा तरी काढावा.

 

टॅग्स :Policeपोलिस