शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

रोवणी खोळंबल्याने सोडले रेगडीच्या दिना जलाशयाचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 05:00 IST

शेतकऱ्यांची मागणी व तक्रारीची दखल घेत आमदार डॉ. होळी यांच्या अध्यक्षतेखाली चामोर्शी तालुका कालवे सल्लागार समितीची बैठक पार पडली. समितीच्या बैठकीनंतर विलंब न करता आमदारांनी रेगडी दिना धरणाची वाट धरली व धरणावर जाऊन जलपूजन केले. मुख्य कार्यकारी अभियंता मेश्राम आणि आमदार होळी यांनी गेट व्हील फिरवून पाटाकरिता पाणी सोडले. शेतकऱ्यांना पुढील पाच दिवस अविरत पाणी पुरवल्या जाईल.

लाेकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : तालुक्यातील रोवणी खोळंबल्याने रेगडीच्या दिना जलाशयाचे पाणी सोडण्यात आले. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळाला आहे. पावसाने दडी मारल्याने पाण्याअभावी तालुक्यातील धान रोवणी खोळंबली आहे. परिसरातील शेतकरी आमदार डॉ. देवराव होळी यांना दिना धरणाचे पाणी सोडण्याबाबत वारंवार विचारणा करीत होते. शेतकऱ्यांची मागणी व तक्रारीची दखल घेत आमदार डॉ. होळी यांच्या अध्यक्षतेखाली चामोर्शी तालुका कालवे सल्लागार समितीची बैठक पार पडली. या बैठकीत पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता अविनाश मेश्राम, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता मिश्रा, चामोर्शी तालुका पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी ए. एस. घोलपे, अभियंता विकास दुधबावरे, एस. टी. बोदलकर, ए. ए. गेडाम, कालवे सल्लागार समितीचे त्रियुगी दुबे, भाजपा तालुका अध्यक्ष दिलीप चलाख, महामंत्री साईनाथ बुरांडे, राजेश्वर चुधरी, भास्कर बुरे, काशिनाथ बुरांडे, श्रावण दुधबावरे, नानाजी बुरांडे उपस्थित होते.समितीच्या बैठकीनंतर विलंब न करता आमदारांनी रेगडी दिना धरणाची वाट धरली व धरणावर जाऊन जलपूजन केले. मुख्य कार्यकारी अभियंता मेश्राम आणि आमदार होळी यांनी गेट व्हील फिरवून पाटाकरिता पाणी सोडले. शेतकऱ्यांना पुढील पाच दिवस अविरत पाणी पुरवल्या जाईल. सलोख्याने पाणी वाटप करून घ्यावे, असे आवाहन  यावेळी केले. दिना जलाशयात ४५ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.

 

टॅग्स :Deena Damदिना धरणDevrao Holiदेवराव होळी