काेराेना याेद्धे दुसऱ्या डाेसच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 05:00 IST2021-05-15T05:00:00+5:302021-05-15T05:00:29+5:30

देशात १६ जानेवारीपासून लसीकरणाचा प्रारंभ झाला. यावेळी फ्रंटलाईन वर्कर व आराेग्य कर्मचाऱ्यांना लस देण्याबाबत प्राधान्य देण्यात आले हाेते. जिल्ह्यात जवळपास २८ हजार फ्रंटलाईन वर्कर आहेत. यापैकी १२ मेपर्यंत एकूण २७ हजार २२८ जणांनी लस घेतली आहे. लसीकरणाला प्रारंभ झाल्यापासूनचा कालावधी लक्षात घेतला तर या सर्वांना दुसरा डाेस मिळाला असता, मात्र अनेकांनी पहिला डाेस घेण्यास विलंब केल्याने दुसऱ्या डाेसची तारीख आली नसल्याने त्यांना दुसरा डाेस घेता आला नाही.

Waiting for the second daisy from Kareena | काेराेना याेद्धे दुसऱ्या डाेसच्या प्रतीक्षेत

काेराेना याेद्धे दुसऱ्या डाेसच्या प्रतीक्षेत

ठळक मुद्देअनेकांनी लस घेण्यास केला उशीर, प्राधान्य देऊनही केले दुर्लक्ष

लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : जिल्हाभरातील २७ हजार २२८ काेराेना याेद्ध्यांनी काेराेना प्रतिबंधात्मक लसचा पहिला डाेस घेतला आहे. त्यापैकी ११ हजार ७७४ याेद्ध्यांनी अजूनही दुसरा डाेस घेतला नाही. काही काेराेना याेद्ध्यांची दुसऱ्या डाेजची तारीख यायची आहे. त्यामुळे त्यांनी दुसरा डाेस घेतला नसला तरी अनेकांनी पहिला डाेस घेण्यास उशीर केल्याने त्यांना दुसऱ्या डाेसचे लसीकरण हाेऊ शकले नाही.
देशात १६ जानेवारीपासून लसीकरणाचा प्रारंभ झाला. यावेळी फ्रंटलाईन वर्कर व आराेग्य कर्मचाऱ्यांना लस देण्याबाबत प्राधान्य देण्यात आले हाेते. जिल्ह्यात जवळपास २८ हजार फ्रंटलाईन वर्कर आहेत. यापैकी १२ मेपर्यंत एकूण २७ हजार २२८ जणांनी लस घेतली आहे. लसीकरणाला प्रारंभ झाल्यापासूनचा कालावधी लक्षात घेतला तर या सर्वांना दुसरा डाेस मिळाला असता, मात्र अनेकांनी पहिला डाेस घेण्यास विलंब केल्याने दुसऱ्या डाेसची तारीख आली नसल्याने त्यांना दुसरा डाेस घेता आला नाही.
काेराेनाच्या दुसऱ्या लाटेतही आराेग्य कर्मचारी व फ्रंटलाईन वर्कर यांना काम करावे लागत आहे. काेराेनापासून हाेणारा धाेका लक्षात घेता या वर्गाला प्राधान्याने लस उपलब्ध करून देण्याची गरज निर्माण झाली आहे.

बहुतांश जणांचे लसीकरण
आराेग्य कर्मचारी व इतर विभागाच्या बहुतांश कर्मचाऱ्यांनी आता पहिली लस घेतली आहे; मात्र दुसरी लस घेतली नाही. मध्यंतरी लसचा तुटवडा निर्माण झाला हाेता. तसेच काही जणांनी काेवॅक्सिन लस घेतली हाेती. ही लस मध्यंतरी उपलब्ध झाली नव्हती. त्यामुळेही काही आराेग्य कर्मचाऱ्यांना दुसरी लस मिळाली नाही. 

जिल्ह्यात काेव्हिशिल्डचा सर्वाधिक पुरवठा
शासनामार्फत सध्या काेव्हॅक्सिन व काेव्हिशिल्ड या दाेन लस उपलब्ध करून दिल्या जात आहेत. गडचिराेली जिल्ह्यात सुरूवातीपासूनच काेव्हिशिल्डचा सर्वाधिक पुरवठा केला जात आहे. आताही बहुतांश केंद्रावर काेव्हिशिल्ड हीच लस उपलब्ध आहे. काेव्हॅक्सिनचा पुरवठा अतिशय कमी आहे.

Web Title: Waiting for the second daisy from Kareena