विसापूर रै. ग्रामपंचायतीत १३ जागांसाठी २७ उमेदवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:33 IST2021-01-18T04:33:09+5:302021-01-18T04:33:09+5:30

आमगाव म. : चामाेर्शी तालुक्यातील १३ सदस्यीय विसापूर रै. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी २० जानेवारीला मतदान प्रक्रिया घेण्यात येणार आहे. विशेष ...

Visapur Rai. 27 candidates for 13 seats in Gram Panchayat | विसापूर रै. ग्रामपंचायतीत १३ जागांसाठी २७ उमेदवार

विसापूर रै. ग्रामपंचायतीत १३ जागांसाठी २७ उमेदवार

आमगाव म. : चामाेर्शी तालुक्यातील १३ सदस्यीय विसापूर रै. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी २० जानेवारीला मतदान प्रक्रिया घेण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, नऊ गावांची ही ग्रामपंचायत असून येथे १३ जागांसाठी २७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. प्रचार शिगेला पाेहाेचला असून पाच प्रभागांत जाेरदार लढत दिसून येत आहे. प्रभाग क्रमांक १ मध्ये एक सदस्य बिनविराेध निवडून आले आहेत. प्रभाग क्रमांक २ मध्ये ७, प्रभाग क्रमांक ३ मध्ये ६, प्रभाग क्रमांक ४ मध्ये ७, प्रभाग क्रमांक ५ मध्ये ४ व प्रभाग क्रमांक ५ मध्ये शिल्लक २ अशा एकूण २६ जागांसाठी मतदान प्रक्रिया हाेणार आहे. सरपंचपदाचे आरक्षण निवडणूक झाल्यानंतर जाहीर हाेत असल्याने नेमक्या प्रभागाचा व काेणत्या प्रवर्गाचा, काेणत्या पॅनलचा उमेदवार सरपंच हाेणार, हे आताच सांगता येत नाही. सरपंचपद आपल्याच पॅनलच्या उमेदवारांना मिळावे, यासाठी राजकीय पदाधिकारी व कार्यकर्ते कामाला भिडले आहेत. संपूर्ण पॅनल निवडून आणण्यासाठी परिश्रम घेतले जात आहेत. प्रभाग क्रमांक २, ३ व ४ या तीन प्रभागांत तगडे उमेदवार रिंगणात उतरल्याने या प्रभागात चुरस निर्माण झाली आहे.

Web Title: Visapur Rai. 27 candidates for 13 seats in Gram Panchayat