रेशन धान्य चोरून नेताना गावकऱ्यांनी पकडले

By Admin | Updated: April 27, 2017 01:13 IST2017-04-27T01:13:26+5:302017-04-27T01:13:26+5:30

गट्टा येथील शासकीय स्वस्त धान्य दुकानातील ४१ पोते तांदूळ व ११ कट्टे साखर २३ एप्रिलच्या रात्री गाडीतून नेत असताना

The villagers apprehended stealing ration grains | रेशन धान्य चोरून नेताना गावकऱ्यांनी पकडले

रेशन धान्य चोरून नेताना गावकऱ्यांनी पकडले

गट्टा येथील घटना : स्वस्त धान्य दुकानदारासह दोघांवर गुन्हे दाखल
एटापल्ली : गट्टा येथील शासकीय स्वस्त धान्य दुकानातील ४१ पोते तांदूळ व ११ कट्टे साखर २३ एप्रिलच्या रात्री गाडीतून नेत असताना गट्टा येथील नागरिकांनी दोघांना पकडले. यासंदर्भात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी दोन आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
गट्टा येथील शासकीय स्वस्त धान्य दुकानातील ४१ पोते तांदूळ व ११ कट्टे साखर एमएच-२९-एम-१४१९ क्रमांकाच्या पीकअप गाडीतून नेत असताना २३ एप्रिलच्या रात्री गट्टा येथील नागरिकांनी पकडले व वाहनातील दोघांना पकडून पोलिसात तक्रार दाखल केली. गट्टा पोलिसांनी २४ एप्रिलला एटापल्ली तहसील कार्यालयास याची माहिती दिली. तहसील कार्यालयाचे पुरवठा निरीक्षक व्ही. डी. देवघरे, गट्टाचे तलाठी शेंडे यांनी २४ व २५ एप्रिलला दोन दिवस घटनेचा पंचनामा करून सदर स्वस्त धान्य दुकान सील केले. सदर वाहन एटापल्ली पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले असून दोन दिवसानंतर २६ एप्रिलला रात्री ८ वाजता रेशन धान्य दुकानदार मोहन वसंत दुर्गे रा. आलापल्ली व वाहनचालक दिनेश मुधकर देवनाथ रा. गट्टा यांच्यावर गुन्हा दाखल केला. या घटनेचा अधिक तपास एटापल्लीचे ठाणेदार शिवाजी राऊत यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

Web Title: The villagers apprehended stealing ration grains