वडेट्टीवार यांची गोंडवाना विद्यापीठावर धडक

By Admin | Updated: May 27, 2015 01:44 IST2015-05-27T01:44:52+5:302015-05-27T01:44:52+5:30

विद्यापीठाच्या विदवत्त व व्यवस्थापन परिषदांवर अपात्र व्यक्तिची नेमणूक करण्यात आली आहे.

Vidaditywar attacked the Gondwana University | वडेट्टीवार यांची गोंडवाना विद्यापीठावर धडक

वडेट्टीवार यांची गोंडवाना विद्यापीठावर धडक

गडचिरोली : विद्यापीठाच्या विदवत्त व व्यवस्थापन परिषदांवर अपात्र व्यक्तिची नेमणूक करण्यात आली आहे. यामुळे विद्यापीठ कायद्याचे उल्लंघन झाले असून याबद्दल आ. विजय वडेट्टीवार यांनी गोंडवाना विद्यापीठावर सोमवारी धडक देऊन कुलसचिव डॉ. विनायक इरपाते यांच्यासोबत या संदर्भात चर्चा केली.
शासनाने विद्यापीठाची पहिली व्यवस्थापन व विदवत्ता परिषद स्थापन केली. यामध्ये विशिष्ट विचारधारा असणाऱ्या व्यक्तींचीच या परिषदेवर निवड करण्यात आली आहे. अभ्यास मंडळाची नेमणूक करताना प्राध्यापकांच्या सेवा ज्येष्ठता यादीला हरताळ फासण्यात आला आहे. त्यामुळे शैक्षणिक सत्रात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. विद्या शाखेच्या अधिष्ठाता पदासाठी नामनिर्देशन झालेले प्राध्यापक नेट- सेट नाही. विद्या परिषदेवर अभ्यास मंडळाचे डीन म्हणून नामनिर्देशन करण्यात आलेल्या काही प्राध्यापकांना कमीत- कमी पाच वर्षाचा अनुभव नाही. विज्ञान व कला शाखेच्या अभ्यास मंडळाचे डीन म्हणून नामनिर्देशन केलेल्या प्राध्यापकाला संबंधीत विषयाचे विभाग प्रमुख म्हणून काम केल्याचा अनुभव नाही. कित्येक प्राध्यापक पीएचडी प्राप्त नाहीत. अशा अनेक अपात्र व्यक्तींची या दोन्ही परिषदांवर नेमणूक करण्यात आली आहे. या दोन्ही परिषदा रद्द करून नव्याने निवड करावी, अशी मागणी कुलसचिव डॉ. विनायक इरपाते यांच्याकडे केली. याबाबत माहितीच्या अधिकारांतर्गत माहितीही मागितली. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर गोेंडवाना युनिव्हर्सिटी टिचर्स असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Vidaditywar attacked the Gondwana University