पशुवैैद्यकीय दवाखाना जीर्ण

By Admin | Updated: April 4, 2017 00:56 IST2017-04-04T00:56:20+5:302017-04-04T00:56:20+5:30

चामोर्शी तालुक्यातील कुनघाडा रै. येथे श्रेणी-१ चा पशुवैैद्यकीय दवाखाना आहे. परंतु या दवाखान्याची इमारत पूर्णत: जीर्ण झाली असून ...

Veterinary clinic dispersed | पशुवैैद्यकीय दवाखाना जीर्ण

पशुवैैद्यकीय दवाखाना जीर्ण

कुनघाडात औषधांचा अभाव : कर्मचारी निवासस्थानही आले मोडकळीस
मार्र्कंडादेव : चामोर्शी तालुक्यातील कुनघाडा रै. येथे श्रेणी-१ चा पशुवैैद्यकीय दवाखाना आहे. परंतु या दवाखान्याची इमारत पूर्णत: जीर्ण झाली असून दवाखान्यासह कर्मचारी निवासस्थानही मोडकळीस आले आहे. या दवाखान्यात एक ते दीड वर्षांपासून औषधांचाही अभाव आहे. त्यामुळे पशुधनांवर उपचार होण्यास अडचणी येत आहेत.
कुनघाडा रै. पशुदवाखान्यांतर्गत कुनघाडा रै., तळोधी मो., नवेगाव रै., खोर्दा, नवतळा सह अन्य एका गावाचा समावेश आहे. दवाखान्याच्या इमारतीसह एका कर्मचाऱ्याचे निवासस्थान येथे आहे. परंतु दोन्ही इमारती जीर्णावस्थेत आहेत. इमारतीचे कौलारू छत मोडकळीस आले आहे. तसेच लाकुड फाटाही कुजलेला आहे. पावसाळ्यात छत गळत असल्याने दलदल निर्माण होते. शिवाय या इमारतीला अनेक ठिकाणी भेगाही पडल्या आहेत. पावसाळ्यात कर्मचाऱ्यांना सेवा देताना अडचणींचा सामना करावा लागतो. दवाखान्याची संरक्षक भिंत अपूर्ण अवस्थेत असल्याने येथे अतिक्रमणही वाढत आहे. संरक्षक भिंतीअभावी दवाखान्याच्या आवारातच काही नागरिक शौचास बसतात. एक ते दीड वर्षांपासून दवाखान्यात सलाईन, इंजेक्शन, दुधवाढीचे पावडर, दुखण्यावरचे औषध उपलब्ध नसल्याने पशुपालकांना बाहेरून औषधी खरेदी करावी लागत आहे. त्यामुळे येथील समस्या मार्गी लावाव्या, अशी मागणी होत आहे.

Web Title: Veterinary clinic dispersed