ज्येष्ठ नागरिक मंडळाची अविराेध निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:36 IST2021-02-10T04:36:54+5:302021-02-10T04:36:54+5:30

गडचिराेली : ज्येष्ठ नागरिक संस्था, गडचिराेलीची कार्यकारी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची साेमवारी अविराेध निवड करण्यात आली. यामध्ये अध्यक्ष म्हणून पांडुरंग ...

Unopposed selection of Senior Citizens Board | ज्येष्ठ नागरिक मंडळाची अविराेध निवड

ज्येष्ठ नागरिक मंडळाची अविराेध निवड

गडचिराेली : ज्येष्ठ नागरिक संस्था, गडचिराेलीची कार्यकारी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची साेमवारी अविराेध निवड करण्यात आली. यामध्ये अध्यक्ष म्हणून पांडुरंग घाेटेकर, उपाध्यक्षपदी सत्यवान वाळके, सचिव म्हणून सुधाकर बावणे, तर काेषाध्यक्षपदी रमेश हेमके आदींची निवड करण्यात आली.

या संस्थेचे ८५० आजीव सदस्य असून, या संस्थेचे १३ सदस्यांचे कार्यकारी मंडळ आहे. या मंडळाचा कार्यकाळ पाच वर्षांचा असून, निवडणूक निर्णय अधिकारी ॲड. नितीन कामडी यांच्या अध्यक्षतेखाली फेब्रुवारी २०२१ ते जानेवारी २०२६ या कालावधीसाठी मंडळातील पदाधिकाऱ्यांची अविराेध निवड करण्यात आली.

या कार्यकारिणीत सहसचिव म्हणून साेपानदेव म्हशाखेत्री, तर सदस्य म्हणून दत्तात्रय पाचभाई, विठ्ठल काेठारे, दिलीप आखाडे, प्रभाकर वासेकर, स्वीकृत सदस्य पुष्पा ब्राम्हणवाडे, विजया गद्देवार तसेेच सल्लागार म्हणून दादाजी चापले, बाळकृष्ण बांबाेळे आदींचा समावेश आहे.

Web Title: Unopposed selection of Senior Citizens Board