हिरापूर ग्रामपंचायतीत अविराेध निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:30 IST2021-01-09T04:30:13+5:302021-01-09T04:30:13+5:30

गडचिराेली : तालुक्यातील हिरापूर ग्रामपंचायतमधील सर्वच सदस्यांची अविराेध निवड करण्यात आली आहे. या ग्रामपंचायतीवर काँग्रेस पक्षाचे वर्चस्व आहे. सदस्यांची ...

Unopposed election in Hirapur Gram Panchayat | हिरापूर ग्रामपंचायतीत अविराेध निवड

हिरापूर ग्रामपंचायतीत अविराेध निवड

गडचिराेली : तालुक्यातील हिरापूर ग्रामपंचायतमधील सर्वच सदस्यांची अविराेध निवड करण्यात आली आहे. या ग्रामपंचायतीवर काँग्रेस पक्षाचे वर्चस्व आहे. सदस्यांची निवड अविराेध करण्यासाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डाॅ. नामदेव उसेंडी, जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, तालुकाध्यक्ष नेताजी गावतुरे यांनी प्रयत्न केले. हिरापूरचे माजी सरपंच दिवाकर मिसार यांच्या नेतृत्वात सातही सदस्यांची अविराेध निवड करण्यात आली आहे. हे सर्व सदस्य काॅंग्रेसचे आहेत. अविराेध निवड झालेल्यांमध्ये दिवाकर निसार, दुर्वा बांबाेळे, रमेश मेश्राम, माधुरी मेश्राम, पुष्पा साेनुले, शालिना कुमरे, वैष्णवी निकुरे यांचा समावेश आहे. युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव विजयसिंग, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, प्रदेश सचिव विश्वजीत काेवासे, अजित सिंग, इरशाद शेख, केतन रेवतकर, लाॅरेंस गेडाम, नेताजी गावतुरे, ढिवरू मेश्राम, डिम्पल बांबाेळे, देवानंद कुमरे, सुरेश साेनुले, पत्रुजी गेडाम यांच्या प्रमुख उपस्थितीत नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

Web Title: Unopposed election in Hirapur Gram Panchayat