विद्यापीठ पदभरतीचा पेपर अगोदरच फुटला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2019 06:00 AM2019-09-22T06:00:00+5:302019-09-22T06:00:21+5:30

गोंडवाना विद्यापीठाने १५ सप्टेंबर रोजी सहायक कुलसचिव, जनसंपर्क अधिकारी, अधीक्षक, सांख्यिकी सहाय्यक, कनिष्ठ लिपीक, उद्यानरेजा व फर्रास या पदांसाठी परीक्षा घेतली. प्रश्नपत्रिकेची गोपनियता पाळण्यासाठी संबंधित प्रश्नपत्रिकेचा लिफापा सिलबंद पर्यवेक्षकाच्या हाती दिला जातो. परीक्षा खोलीतील विद्यार्थ्यांना लिफापा सिलबंद असल्याची विद्यार्थ्यांकडून खात्री करून घेतात.

University vacancy appointment paper already broken? | विद्यापीठ पदभरतीचा पेपर अगोदरच फुटला?

विद्यापीठ पदभरतीचा पेपर अगोदरच फुटला?

googlenewsNext
ठळक मुद्देचौकशीची मागणी : कुलगुरूंना काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : १५ सप्टेंबर रोजी विविध पदांसाठी गोंडवाना विद्यापीठाने घेतलेल्या परीक्षेचे पेपर अगोदरच फुटले असल्याचा आरोप करीत या प्रकरणाची चौैकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेसचे महासचिव कुणाल पेंदोरकर यांनी कुलगुरू यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
गोंडवाना विद्यापीठाने १५ सप्टेंबर रोजी सहायक कुलसचिव, जनसंपर्क अधिकारी, अधीक्षक, सांख्यिकी सहाय्यक, कनिष्ठ लिपीक, उद्यानरेजा व फर्रास या पदांसाठी परीक्षा घेतली. प्रश्नपत्रिकेची गोपनियता पाळण्यासाठी संबंधित प्रश्नपत्रिकेचा लिफापा सिलबंद पर्यवेक्षकाच्या हाती दिला जातो. परीक्षा खोलीतील विद्यार्थ्यांना लिफापा सिलबंद असल्याची विद्यार्थ्यांकडून खात्री करून घेतात. त्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांच्या स्वाक्षºया घेऊन तो फोडला जातो. मात्र विद्यापीठाने घेतलेल्या परीक्षेदरम्यान खुल्या प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्रात आणण्यात आल्या. संबंधित प्रश्नपत्रिकेवर नाममात्र लहानशी सीलपट्टी लावण्यात आली होती. मात्र सदर प्रश्नपत्रिका उघडून बघता येत होती.
उत्तरपत्रिका प्रश्नपत्रिकेच्या आत सीलद्वारे बंद करून ठेवल्या असतात. सदरचे सील परीक्षा सुरू होण्यापूर्वी तोडू किंवा उघडू नये. सदर सील पर्यवेक्षकाने सांगितल्यावरच तोडावे किंवा उघडावे, अशा सूचना परीक्षार्थ्यांना दिल्या होत्या. मात्र प्रत्यक्ष परीक्षा केंद्रात उत्तरपत्रिका वेगळी व प्रश्नपत्रिका वेगळी देण्यात आली. विद्यापीठाने स्वत:च बनविलेल्या नियमाचा भंग केला. त्यामुळे या पदभरतीची चौकशी करावी, अशी मागणी पेंदोरकर यांनी केली आहे.
याबाबत प्रतिक्रिया घेण्यासाठी परीक्षा नियंत्रक अनिल चिताडे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांचा भ्रमणध्वनी बंद होता.

Web Title: University vacancy appointment paper already broken?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.