दोन महिन्यातच पावसाने खचला बंधारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2020 05:00 AM2020-07-09T05:00:00+5:302020-07-09T05:00:57+5:30

कुरखेडा तालुक्यात सोनसरी, चांदागड, बांधगाव, सावरगाव, येंगलखेडा आदी ठिकाणी एका कंपनीमार्फत बंधारे बांधले जात आहेत. सोनसरी येथे बांधण्यात आलेल्या बंधारा बांधकाम पूर्णत्त्वाचा कालावधी तीन महिने होता. परंतु याकरिता पाच ते सहा महिने लावण्यात आले. बांधकामासाठी काढलेली माती नाल्यामध्येच बंधाऱ्याच्या वरच्या बाजूला ठेवली. त्यामुळे पहिल्याच पावसातील पुराच्या प्रवाहाने एका बाजूने मार्ग काढला.

In two months, the dam was destroyed by rains | दोन महिन्यातच पावसाने खचला बंधारा

दोन महिन्यातच पावसाने खचला बंधारा

Next
ठळक मुद्देसोनसरीजवळील काम : निकृष्ट बांधकाम झाल्याचा शेतकऱ्यांचा आरोप; चौकशी करून कारवाई करा

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली/कुरखेडा : कुरखेडा तालुक्याच्या सोनसरी गावाजळील नदीवर एका बांधकाम कंपनीकडून कोल्हापुरी बंधाºयाचे बांधकाम हाती घेण्यात आले होते. दोन महिन्यांपूर्वी मे महिन्यात या बंधाऱ्याचे बांधकाम पूर्ण झाले. यावर ८० ते ८५ लाखांचा खर्च झाला. मात्र दोन महिन्यानंतर आलेल्या पहिल्याच पावसातील पुरात बंधारा वाहून गेला. सदर बंधाºयाचे निकृष्ट बांधकाम झाले, असा आरोप करीत बांधकामाची चौकशी करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
कुरखेडा तालुक्यात सोनसरी, चांदागड, बांधगाव, सावरगाव, येंगलखेडा आदी ठिकाणी एका कंपनीमार्फत बंधारे बांधले जात आहेत. सोनसरी येथे बांधण्यात आलेल्या बंधारा बांधकाम पूर्णत्त्वाचा कालावधी तीन महिने होता. परंतु याकरिता पाच ते सहा महिने लावण्यात आले. बांधकामासाठी काढलेली माती नाल्यामध्येच बंधाऱ्याच्या वरच्या बाजूला ठेवली. त्यामुळे पहिल्याच पावसातील पुराच्या प्रवाहाने एका बाजूने मार्ग काढला. परिणामी एका शेतकऱ्यांच्या शेताकडील नाल्याचा भाग वाहून गेला. तसेच शेतामध्येही माती पसरली. बंधारा बांधकामावर कोणत्याही शासकीय अभियंत्याची देखरेख नव्हती. सरळ रेषेत बंधारा का बांधला नाही, याबाबत विचारणा केली असता, सेंट्रिंगचे पल्ले जागा सोडल्याचे सांगण्यात आले. जलसंधारण विभाग गडचिरोली कार्यालयाचे दुर्लक्ष असल्याने कंपनीचे अधिकारी मनमर्जीने काम करीत आहेत. गैैरप्रकार झाकण्यासाठी सध्या डागडुजीचे काम येथे सुरू आहे. तालुक्यात अनेक ठिकाणी बंधारे बांधले आहेत. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी शेतकºयांसह माजी जि. प. सदस्य सुरेंद्रसिंह चंदेल यांनी केली आहे.

Web Title: In two months, the dam was destroyed by rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.