वाघाच्या हल्ल्यात दोन शेळ्या ठार

By Admin | Updated: June 15, 2015 01:41 IST2015-06-15T01:41:58+5:302015-06-15T01:41:58+5:30

तालुक्यातील शंकरनगर येथील शसन रॉय यांच्या शेळीच्या गोठ्यात शिरून वाघाने हल्ला केला.

Two goats killed in tiger attack | वाघाच्या हल्ल्यात दोन शेळ्या ठार

वाघाच्या हल्ल्यात दोन शेळ्या ठार

शंकरनगरातील घटना : गोठ्यात शिरून हल्ला
आरमोरी : तालुक्यातील शंकरनगर येथील शसन रॉय यांच्या शेळीच्या गोठ्यात शिरून वाघाने हल्ला केला. या हल्ल्यात दोन शेळ्या जागीच ठार झाल्या आहेत. सदर घटना रविवारी पहाटेच्या सुमारास घडली.
शसन रॉय यांच्या घराच्या बाजुलाच शेळ्यांचा गोठा आहे. या गोठ्यामध्ये आठ शेळ्या होत्या. गोठ्याला असलेल्या लहानशा खिडकीतून वाघाने गोठ्यात प्रवेश केला व दोन शेळ्यांना जागीच ठार केले. शेळ्यांच्या ओरडण्याचा आवाज येताच शसन रॉय यांचे कुटुंबिय जागे झाले. त्यांनी वाघाला पिटाळून लावले. यापूर्वीही शंकरनगर परिसरातील जनावरांवर वाघाने हल्ला केला आहे. वन विभागाने सदर वाघाचा बंदोबस्त करून रॉय यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी गावातील नागरिकांकडून करण्यात येत आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Two goats killed in tiger attack