अपघातग्रस्त वाहनातून तंबाखू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2021 05:00 IST2021-11-20T05:00:00+5:302021-11-20T05:00:42+5:30

एमएच ४० ए ७१५८ क्रमांकाच्या स्काॅर्पिओ या वाहनाचे मागील टायर फुटल्याने वाहन अनियंत्रित होत हेटीनगर गावाजवळ रस्त्याच्या कडेला उलटले. यावेळी वाहन चालक कमलदास अरुण भारद्वाज (२३) हा एकटाच वाहनात होता. मात्र, सुदैवाने त्याला कोणतीच दुखापत झाली नाही. अपघाताची माहिती मिळताच प्रभारी अधिकारी प्रतापसिंह जाधव यांनी तातडीने घटनास्थळावर पोहोचत वाहनाची झडती घेतली. वाहनातून १ लाख ५५ हजार १४८ रुपये किमतीची प्रतिबंधित सुगंधीत तंबाखू आढळून आली.

Tobacco seized from wrecked vehicle | अपघातग्रस्त वाहनातून तंबाखू जप्त

अपघातग्रस्त वाहनातून तंबाखू जप्त

लाेकमत न्यूज नेटवर्क
कुरखेडा : कोरची मार्गे कुरखेडा, आरमोरी येथे सुगंधीत तंबाखूची वाहतूक करणारे भरधाव चारचाकी वाहन शुक्रवारी पुराडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या हेटीनगर गावाजवळ अनियंत्रित होत उलटले. अपघाताची माहिती मिळताच पाेलीस घटनास्थळी पाेहाेचले असता वाहनात सुगंधी तंबाखू आढळून आली. चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
  एमएच ४० ए ७१५८ क्रमांकाच्या स्काॅर्पिओ या वाहनाचे मागील टायर फुटल्याने वाहन अनियंत्रित होत हेटीनगर गावाजवळ रस्त्याच्या कडेला उलटले. यावेळी वाहन चालक कमलदास अरुण भारद्वाज (२३) हा एकटाच वाहनात होता. मात्र, सुदैवाने त्याला कोणतीच दुखापत झाली नाही. अपघाताची माहिती मिळताच प्रभारी अधिकारी प्रतापसिंह जाधव यांनी तातडीने घटनास्थळावर पोहोचत वाहनाची झडती घेतली. वाहनातून १ लाख ५५ हजार १४८ रुपये किमतीची प्रतिबंधित सुगंधीत तंबाखू आढळून आली. तंबाखूसह ३ लाख ५० हजार रुपये किमतीचे वाहन जप्त करण्यात आले. वाहन चालक कमलदास भारद्वाज याच्याविरोधात भादंवि २७९,२७२,२७३,१८८ व सहकलम मोटार वाहन कायदा १८४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. 
पुढील तपास प्रभारी अधिकारी प्रतापसिंह जाधव, पोलीस हवालदार संतोष धोटे, प्रभू पिल्लारे, यशवंत जुमनाके करीत आहेत.

 

Web Title: Tobacco seized from wrecked vehicle