शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

श्री पद्धतीमुळे दीडपट उत्पन्न वाढ

By admin | Updated: August 18, 2014 23:30 IST

धानाची रोवणी करीत असतांना पारंपरिक पद्धतीपेक्षा नवीन पद्धतीचा वापर केल्यास अधिकाधिक उत्पन्न येऊ शकते, धानाचे पीक घेण्याच्या प्रचलित पद्धतीमध्ये श्री पद्धती अत्यंत कमी खर्चाची

देसाईगंज : धानाची रोवणी करीत असतांना पारंपरिक पद्धतीपेक्षा नवीन पद्धतीचा वापर केल्यास अधिकाधिक उत्पन्न येऊ शकते, धानाचे पीक घेण्याच्या प्रचलित पद्धतीमध्ये श्री पद्धती अत्यंत कमी खर्चाची असून या पद्धतीत इतर पद्धतीने लागवड केलेल्या तुलनेत कमी पाणी व इतर संसाधनाची आवश्यकता अत्यल्प भासते. या तुलनेत श्री पद्धतीने लागवड केलेल्या पिकातून दीड ते दोन पट उत्पन्न घेता येते, अशी माहिती कृषी पर्यवेक्षक बी. एम. देशमुख, कृषी सहायक योगेश बोरकर यांनी कुरूड येथे पंढरी राऊत यांच्या शेतावर श्री पद्धत धान रोवणी प्रात्यक्षिकादरम्यान दिली. श्री पद्धतीने धानाची लागवड केली असता केवळ ५ किलो बियाणांवर एक हेक्टर क्षेत्रावर धानाची रोवणी करता येते. एका चुडामध्ये ५० ते १५० पर्यंत फुटवे येण्याची क्षमता असते. त्याबरोबरच प्रचलित पद्धतीच्या तुलनेत १० ते १५ दिवस आधी पीक कापणीला येतो. या पद्धतीनुसार बांधीत पाणी साचवून ठेवायचे नसल्याने अत्यल्प पाण्यावरही सदर पीक घेतले जाते. देसाईगंज तालुक्यात धानाचे पीक वर्षातून दोनदा घेतले जात असल्याने बहुतांश शेतकरी श्रीपद्धतीनुसार धानाची रोवणी करीत आहेत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या उत्पादनात भरघोस वाढ झाली आहे. इतरही शेतकऱ्यांनी श्रीपद्धतीचा वापर करून उत्पन्न वाढवावे असे आवाहन तालुका कृषी अधिकाऱ्यांनी केले आहे. (तालुका प्रतिनिधी)