शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
2
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
3
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
4
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
5
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
6
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
7
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
8
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
9
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
10
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
11
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
12
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
13
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
14
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
15
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
16
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
17
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
18
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
19
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
20
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन विहिरींसाठी हजारावर प्रस्ताव, तुम्ही अर्ज केला का ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2024 12:52 IST

कृषी विभागाची योजना : अनुसूचित जाती-जमातीचे शेतकरी लाभार्थी

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : अनुसूचित जाती, नवबौद्ध तसेच अनुसूचित जमाती संवर्गातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाच्या वतीने विविध योजना राबविल्या जात आहेत. अनुसूचित जातींसाठी असलेली यापैकीच एक योजना म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेचा उल्लेख करता येईल. तर अनुसूचित जमाती घटकासाठी बिरसा मुंडा योजना राबविली जात आहे. या दोन्ही योजनेंतर्गत जिल्ह्यात एकूण १ हजार १८९ अर्ज जिल्हा परिषदेला प्राप्त झाले. 

अनुसूचित जाती, जमाती संवर्गातील शेतकऱ्यांना शेती कसताना त्यांना ओलिताची सोय करून देण्यासाठी दोन्ही योजना राबविल्या जात आहेत. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सिंचन विहिरींचा लाभ दिला जातो. नवीन विहिरींच्या मंजुरीसह जुन्या विहिरींची दुरुस्ती, साहित्य खरेदी करण्यासाठी अनुदान दिले जाते.

काय आहे कृषी स्वावलंबन योजना? अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील शेतकऱ्यांना सिंचन विहिरीचा लाभ देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना आहे.

कोणाला लाभ? डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेचा लाभ अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील शेतकऱ्यांना तर बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचा लाभ अनुसूचित जमातीला घेता येतो. त्यांचे वार्षिक उत्पन्न दीड लाखांच्या आत असावे.

जुनी विहीर दुरुस्तीसाठी ५० हजार अर्थसाहाय्य जुनी विहीर दुरुस्तीसाठी ५० हजार रुपये दिले जातात; परंतु शेतकरी जी विहीर दुरुस्त करत आहे ती विहीर खासगी असावी. योजनेच्या लाभातील नसावी, अशी अट आहे.

अर्ज कसा कराल? शासनाच्या महाडीबीटी पोर्टलला भेट देऊन या पोर्टलवरून ऑनलाइन अर्ज सादर करता येतो.

असे प्राप्त झाले अर्ज डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेंतर्गत ८७२ अर्ज तर बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेंतर्गत २६९ अर्ज जिल्हा परिषदेला प्राप्त झालेले आहेत. तसेच क्षेत्राबाहेरील योजनेअंतर्गत ४८ अर्ज प्राप्त झाले आहेत.

कशासाठी किती पैसे मिळतात?नवीन विहिरीसाठी २.५० लाख नवीन विहीर बांधकामासाठी शासनाकडून या योजनेंतर्गत २ लाख ५० हजार रुपयांचे अर्थसाहाय्य वितरित केले जाते.

मोटार पंपासाठी २० हजार मोटार पंप किंवा डिझेल इंजिनसाठी शेतकऱ्यांना २० हजार रुपयांचे अर्थसाहाय्य वितरित केले जाते. वीज जोडणीसाठी १० हजारांचे अर्थसाहाय्य दिले जाते.

पाइप खरेदीसाठी ३० हजार पाइप खरेदीसाठी शासनाकडून शेतकऱ्याला ३० हजार रुपयांचे अर्थसाहाय्य दिले जाते. प्राप्त अनुदानातून शेतकऱ्यांना पाइप खरेदी करता येते.

"सिंचन विहिरींच्या लाभासाठी शेतकऱ्यांकडून ऑनलाइन अर्ज प्राप्त झालेले आहेत. या अर्जाची छाननी झालेली नाही. छाननीनंतर लाभार्थी निश्चित केले जातील."- प्रदीप तुमसरे, कृषी विकास अधिकारी जि. प 

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली