शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
3
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI च्या विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
4
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
5
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
6
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
9
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
10
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
12
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
13
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
14
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
15
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
16
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
17
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
18
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
19
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
20
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
Daily Top 2Weekly Top 5

चोरीचा प्रयत्न फसल्याच्या रागातून घडले ‘ते’ हत्याकांड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2021 05:00 IST

नितेश प्रभाकर श्रीकुंटवार (२५ वर्षे) रा. काळागोटा, आरमोरी असे आरोपीचे नाव आहे. पंचवटी नगरातील मृत निमगडे यांच्या शेजारी रात्री चोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपी नितेश याला गौतम निमगडे यांनी पाहिले आणि हटकले. त्यामुळे चोरी करण्याचा त्याचा प्रयत्न फसला. तोच राग मनात ठेवून   नितेश याने लगेच हातात धारदार दगड घेऊन गौतम निमगडे यांचे घर गाठले.

लाेकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : येथे दोन दिवसांपूर्वी (दि.२३ नोव्हेंबर) झोपेतून उठवत पती-पत्नीवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या आणि पतीच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या आरोपीला हुडकून काढण्यात पोलिसांना यश आले. विशेष म्हणजे, त्याने आपला गुन्हा कबूल करत या हत्याकांडामागील कारणही स्पष्ट केले. न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. नितेश प्रभाकर श्रीकुंटवार (२५ वर्षे) रा. काळागोटा, आरमोरी असे आरोपीचे नाव आहे. पंचवटी नगरातील मृत निमगडे यांच्या शेजारी रात्री चोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपी नितेश याला गौतम निमगडे यांनी पाहिले आणि हटकले. त्यामुळे चोरी करण्याचा त्याचा प्रयत्न फसला. तोच राग मनात ठेवून   नितेश याने लगेच हातात धारदार दगड घेऊन गौतम निमगडे यांचे घर गाठले. दरवाजाची घंटी वाजविली. त्यांनी दार उघडताच आरोपीने कोणताही विचार न करता गौतम निमगडे व त्यांची पत्नी माया यांच्यावर हल्ला केला. यात गौतम यांचा मृत्यू झाला, तर माया गंभीर जखमी झाल्या. कोणाशीही वैर नसणाऱ्या व्यक्तीच्या या हत्याकांडाने आरमोरी शहर हादरून गेले होते.

झटापटीत पडलेल्या मोबाईलमुळे लागला शोध-    आरोपी नितेश याने गौतम निमगडे  यांच्या डोक्यावर दगडाने वार केल्यानंतर निमगडे यांची पत्नी त्यांना सोडवण्यासाठी मध्ये आली. त्यामुळे आरोपीने तिलाही दगडाने मारहाण केली. या झटापटीत आरोपीचा मोबाईल घटनास्थळी पडला. त्या मोबाईलवरूनच आरोपीचा माग काढण्यात पोलिसांना यश आले. या घटनेनंतर आरोपी हा ब्रह्मपुरी तालुक्यातील बरडकिन्ही  येथील आपल्या बहीणजावयाकडे पळून गेला होता. तेथून आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक  केली.

बलात्कार प्रकरणात सुटलेला आरोपीया प्रकरणात अटक झालेला आरोपी नितेश श्रीकुंटवार हा चिडखोर  आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. १०-१२ दिवसांपूर्वीच तो बलात्काराच्या एका प्रकरणात  चंद्रपूर येथील कारागृहातून जामिनावर सुटून आला होता. घटनेच्या वेळी तो दारूच्या नशेत होता, असे सांगितले जाते. चोरी करण्याच्या उद्देशाने गेला पण तो डाव यशस्वी न झाल्याने रागात त्याने ही हत्या केली. आता पाेलीस काेठडीदरम्यान त्याचे आणखी काही कारनामे समाेर येण्याची शक्यता आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक मनोज काळबांडे करीत आहेत.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी