शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शापोआ कर्मचाऱ्यांना कामावर घ्या

By admin | Updated: December 21, 2015 01:38 IST

काही ठिकाणी गावातील राजकीय मंडळींनी हस्तक्षेप करून जुन्या कर्मचाऱ्यांना सरसकट कामावरून कमी केले.

अहेरी पं. स. वर धडक : चुकीच्या पद्धतीने कामावरून कमी केल्याचा आरोपअहेरी : काही ठिकाणी गावातील राजकीय मंडळींनी हस्तक्षेप करून जुन्या कर्मचाऱ्यांना सरसकट कामावरून कमी केले. त्यामुळे जुन्या कर्मचाऱ्यांवर अन्याय झाला. चुकीच्या पद्धतीने कामावरून कमी केलेल्या कर्मचाऱ्यांना पूर्ववत कामावर घ्यावे या मागणीसाठी तालुक्यातील शापोआ कर्मचाऱ्यांच्या वतीने शनिवारी अहेरी पंचायत समितीवर धडक मोर्चा काढून निदर्शने करण्यात आली. मागील १५ ते २० वर्षांपासून शालेय पोषण आहार कर्मचारी ग्रामीण भागात जि. प. शाळा, खासगी अनुदानित शाळांमध्ये अत्यल्प मानधनावर शालेय पोषण आहार शिजविण्याचे काम कर्मचारी करीत आहेत. सुरूवातीला कर्मचाऱ्यांना १० ते १५ रूपये मजुरी दिली जायची तरीसुद्धा कर्मचारी काम करत राहिले आहेत. कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ व्हावी, याकरिता आयटकच्या नेतृत्त्वात अनेकदा आंदोलने, मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर सरकारने शापोआ कर्मचाऱ्यांना २०११ पासून विद्यार्थी संख्येनुसार मानधन देण्याचे मान्य केले. परंतु अहेरी तालुक्यातील जि. प. शाळा पुसूकपल्ली तसेच राजे धर्मराव हायस्कूल आलापल्ली येथील कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आले. त्यामुळे सदर कर्मचाऱ्यांना पूर्ववत कामावर घ्यावे या मागणीसाठी पं. स. वर जिल्हाध्यक्ष विनोद झोडगे यांच्या नेतृत्त्वात मोर्चा काढण्यात आला. यावेळी गणेश चापले, शकुंतला गुरनुले, किशोर पेंदाम, किशोर सुनतकर उपस्थित होते. पं. स. चे शापोआ अधीक्षक पाचांगे व संवर्ग विकास अधिकारी सुभाष चांदेकर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना १५ हजार रूपये प्रतिमाह वेतन देणे, आॅक्टोबरपासूनचे थकीत मानधन व इंधन बिल बँक खात्यात जमा करणे, प्रत्येक शाळांना गॅस सिलिंडरचा पुरवठा करून त्याचा खर्च सरकारने भरावा, कर्मचाऱ्यांना ओळखपत्र, वर्षातून दोन गणवेश द्यावे आदी मागण्यांवर चर्चा करण्यात आली. कमी केलेल्या स्वयंपाकी महिलांना पूर्ववत कामावर घेण्याचे आश्वासन तसेच नोव्हेंबरपासूनचे वेतन खात्यात जमा करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. यावेळी मानधन वाढीसाठी जानेवारी महिन्यात मुख्यमंत्री, अर्थमंत्री, आमदार, खासदारांच्या घरावर मोर्चा काढण्याचेही ठरविण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)