आकस्मिक भेट देऊन गुणवत्तेचा घेतला आढावा

By Admin | Updated: August 29, 2016 02:20 IST2016-08-29T02:20:07+5:302016-08-29T02:20:07+5:30

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोलीचे प्राचार्य डॉ. रवींद्र रमतकर यांच्यासह संस्थेचे ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉ. धनंजय चापले,

Take a chance to visit and take quality test | आकस्मिक भेट देऊन गुणवत्तेचा घेतला आढावा

आकस्मिक भेट देऊन गुणवत्तेचा घेतला आढावा

मार्गदर्शन : विद्यार्थ्यांशी साधला संवाद
गडचरोली : जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोलीचे प्राचार्य डॉ. रवींद्र रमतकर यांच्यासह संस्थेचे ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉ. धनंजय चापले, डॉ. विनीत मत्ते व डॉ. नरेश वैद्य, साधनव्यक्ती गिरडकर यांनी बोदली केंद्रातील जिल्हा परिषदेच्या मेंढा, विश्रामपूर, अलोणीतेला, माडेतुकूम, खरपुंडी व बोदली या सहा शाळांना शनिवारी आकस्मिक भेट देऊन विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा आढावा घेतला व शिक्षकांना मार्गदर्शन केले.
१५ दिवसांपूर्वी पायाभूत चाचणी घेण्यात आली. ही चाचणी देणाऱ्या विद्यार्थ्यांचा श्रेणीनिहाय आढावा घेताला असता, विद्यार्थी गणित विषयापेक्षा भाषा विषयात मागे असल्याचे दिसून आले. ‘क’ व ‘ड’ श्रेणीत असलेल्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांचे विश्लेषन करावे, ‘ड’ श्रेणीत असलेल्या विद्यार्थ्यांकडे मुख्याध्यापक व शिक्षकांनी विशेष लक्ष द्यावे, ते विद्यार्थी दत्तक घेऊन त्यांच्यासाठी विशेष कृती कार्यक्रम तयार करावा, असे मार्गदर्शन प्राचार्य डॉ. रमतकर यांनी केले. काही सकारात्मकही बाबी दिसून आल्या. यामध्ये पहिल्या वर्गाचे विद्यार्थी चित्रांवरून गोष्ट तयार करतात व सांगतात. विद्यार्थ्यांना गणित विषयाच्या मूलभूत क्षमता अवगत आहेत. भेट दिलेल्या सहाही शाळेत विद्यार्थ्यांची चांगली उपस्थित दिसून आली. मुले पुढे येऊन बोलत होती. यावरून विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास होत असल्याचे दिसून आले. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Take a chance to visit and take quality test