शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

अवैध दारू व तंबाखूजन्य पदार्थ विक्रीविरोधात कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 05:00 IST

 मुक्तिपथ अंतर्गत जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांची कार्यशाळा पोलीस अधीक्षक कार्यालयात बुधवार १० फेब्रुवारीला पार पडली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक समीर शेख, मुक्तिपथचे संचालक डॉ. मयूर गुप्ता, उपसंचालक संतोष सावळकर, डॉ. नंदू मेश्राम,  पोलीस अधिकारी व मुक्तिपथ तालुका कार्यकर्ते उपस्थित होते. तर काही उपविभागीय पोलीस अधिकारी, ठाणेदार, प्रभारी अधिकारी ऑनलाईन जुळले होते. 

ठळक मुद्देपाेलीस अधीक्षकांची सूचना : मुक्तिपथ अभियानांतर्गत कार्यशाळा

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यात अवैध दारू व तंबाखू विक्रीचे प्रमाण कमी करण्यासाठी पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मुक्तिपथ अभियानाच्या समन्वयातून कृती करावी. ग्रामीण भागासह शहरी भागातीलसुद्धा दारूविक्रेत्यांवर कारवाई करीत जिल्हा दारूबंदीची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशा सूचना पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिल्या.  मुक्तिपथ अंतर्गत जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांची कार्यशाळा पोलीस अधीक्षक कार्यालयात बुधवार १० फेब्रुवारीला पार पडली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक समीर शेख, मुक्तिपथचे संचालक डॉ. मयूर गुप्ता, उपसंचालक संतोष सावळकर, डॉ. नंदू मेश्राम,  पोलीस अधिकारी व मुक्तिपथ तालुका कार्यकर्ते उपस्थित होते. तर काही उपविभागीय पोलीस अधिकारी, ठाणेदार, प्रभारी अधिकारी ऑनलाईन जुळले होते. मुक्तिपथ हा महाराष्ट्र शासनाचा मॉडेल कार्यक्रम असून गडचिरोली जिल्ह्यात सुरु करण्यात आलेला महत्वाचा कार्यक्रम आहे. मुख्यमंत्री स्वतः या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत. प्रत्येक पोलीस ठाण्याला दारू, तंबाखू नियंत्रणासाठी कृती कार्यक्रम देण्यात आला आहे. त्याचा दर महिन्याला आढावा घेतला जाईल. दारूबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यात मी स्वतः पोलीस अधीक्षक म्हणून काम केले आहे. याच अनुभवातून गडचिरोली जिल्ह्यात असलेल्या मुक्तिपथ या विशेष नियोजित कार्यक्रमाच्या माध्यमातून अधिक चांगले काम करता येईल, असेही गोयल म्हणाले. याप्रसंगी डॉ. मयूर गुप्ता यांनी मुक्तिपथची माहिती दिली. दारू व तंबाखू विक्रीचे प्रमाण कमी करण्यासाठी असलेला कृती आराखडा सादर केला. दारू विक्रीचे अधिक प्रमाण असलेल्या गावांची यादी मुक्तिपथने पोलीस विभागाला दिली. त्यापैकी गाव संघटनांच्या माध्यमातून किती गावांमध्ये अहिंसक कृती करण्यात आली. सुगंधित तंबाखू विक्रेत्यांवर करण्यात आलेल्या कारवाईची माहिती दिली. 

ॲक्शन प्लॅन राबवाग्रामीण भागात गाव संघटनांच्या माध्यमातून दारू विक्रेत्यांविरोधात कृती केली जात आहे. मात्र, शहरात अवैध दारू विक्रीचे प्रमाण अधिक झाले असून दारूविक्री राेखण्याबाबत सूचविले. यावेळी पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी मुक्तिपथच्या कामाचे काैतुक करीत पोलीस व मुक्तिपथने तयार केलेल्या ‘ॲक्शन प्लॅन’नुसार कारवाई करीत दारू व तंबाखूविक्रीचे प्रमाण कमी करणार असल्याचे सांगितले.

 

टॅग्स :liquor banदारूबंदीTobacco Banतंबाखू बंदी