शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

अवैध दारू व तंबाखूविक्रीविरोधात कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:38 IST

गडचिरोली : जिल्ह्यात अवैध दारू व तंबाखू विक्रीचे प्रमाण कमी करण्यासाठी पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मुक्तिपथ अभियानाच्या समन्वयातून कृती करावी. ...

गडचिरोली : जिल्ह्यात अवैध दारू व तंबाखू विक्रीचे प्रमाण कमी करण्यासाठी पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मुक्तिपथ अभियानाच्या समन्वयातून कृती करावी. ग्रामीण भागासह शहरी भागातीलसुद्धा दारूविक्रेत्यांवर कारवाई करीत जिल्हा दारूबंदीची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशा सूचना पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिल्या.

मुक्तिपथ अंतर्गत जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांची कार्यशाळा पोलीस अधीक्षक कार्यालयात बुधवार १० फेब्रुवारीला पार पडली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक समीर शेख, मुक्तिपथचे संचालक डॉ. मयूर गुप्ता, उपसंचालक संतोष सावळकर, डॉ. नंदू मेश्राम, पोलीस अधिकारी व मुक्तिपथ तालुका कार्यकर्ते उपस्थित होते. तर काही उपविभागीय पोलीस अधिकारी, ठाणेदार, प्रभारी अधिकारी ऑनलाईन जुळले होते.

मुक्तिपथ हा महाराष्ट्र शासनाचा मॉडेल कार्यक्रम असून गडचिरोली जिल्ह्यात सुरु करण्यात आलेला महत्वाचा कार्यक्रम आहे. मुख्यमंत्री स्वतः या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत. प्रत्येक पोलीस ठाण्याला दारू, तंबाखू नियंत्रणासाठी कृती कार्यक्रम देण्यात आला आहे. त्याचा दर महिन्याला आढावा घेतला जाईल. दारूबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यात मी स्वतः पोलीस अधीक्षक म्हणून काम केले आहे. याच अनुभवातून गडचिरोली जिल्ह्यात असलेल्या मुक्तिपथ या विशेष नियोजित कार्यक्रमाच्या माध्यमातून अधिक चांगले काम करता येईल, असेही गोयल म्हणाले. याप्रसंगी डॉ. मयूर गुप्ता यांनी मुक्तिपथची माहिती दिली. दारू व तंबाखू विक्रीचे प्रमाण कमी करण्यासाठी असलेला कृती आराखडा सादर केला. दारू विक्रीचे अधिक प्रमाण असलेल्या गावांची यादी मुक्तिपथने पोलीस विभागाला दिली. त्यापैकी गाव संघटनांच्या माध्यमातून किती गावांमध्ये अहिंसक कृती करण्यात आली. सुगंधित तंबाखू विक्रेत्यांवर करण्यात आलेल्या कारवाईची माहिती दिली. ग्रामीण भागात गाव संघटनांच्या माध्यमातून दारू विक्रेत्यांविरोधात कृती केली जात आहे. मात्र, शहरात अवैध दारू विक्रीचे प्रमाण अधिक झाले असून दारूविक्री राेखण्याबाबत सूचविले. यावेळी पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी मुक्तिपथच्या काैतुक करीत पोलीस व मुक्तिपथने तयार केलेल्या ‘ॲक्शन प्लॅन'नुसार कारवाई करीत जिल्ह्यातील दारू व तंबाखूविक्रीचे प्रमाण कमी करणार असल्याचे सांगितले.