शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

छत्तीसगडच्या व्यापाऱ्यांना हाेताे जनावरांचा पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:30 IST

देसाईगंज : शेतकऱ्यांकडे असलेल्या हाडकुळ्या जनावरांची नाममात्र किमतीत खरेदी करून छत्तीसगड राज्यातील बड्या व्यापाऱ्यांना पुरवठा करणारी टाेळी देसाईगंज तालुक्यात ...

देसाईगंज : शेतकऱ्यांकडे असलेल्या हाडकुळ्या जनावरांची नाममात्र किमतीत खरेदी करून छत्तीसगड राज्यातील बड्या व्यापाऱ्यांना पुरवठा करणारी टाेळी देसाईगंज तालुक्यात सक्रिय झाली आहे. तालुका मुख्यालयापासून १२ किमी अंतरावर असलेल्या कळमगाव येथील अड्ड्यावर रात्रीच्या सुमारास छत्तीसगड राज्यात पाळीव जनावरे पुरविली जात असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात पाळीव जनावरांच्या खरेदी, विक्री व तस्करीचा व्यवसाय जाेमात सुरू आहे.कळमगाव या जंगलव्याप्त गावात मागील काही महिन्यांपासून तालुक्यातील जनावरांची खरेदी करून अड्ड्यावर जमा केले जातात. सक्रिय टाेळीच्या माध्यमातून खरेदी करण्यात आलेली जनावरे रात्रीच्या सुमारास वाहनात काेंबून कळमगाव येथील अड्ड्यावर पाेहचविले जात आहेत. गडचिराेली जिल्ह्यातील काही तालुका मुख्यालय तसेच छत्तीसगड राज्यात दलालाच्या मार्फतीने पुरवठा केली जातात. एका जनावराची १० ते १५ हजार रुपयात विक्री करून दिवसाकाठी एका जनावरामागे तस्करांना दीड ते दाेन हजार रुपये मिळतात. २० ते २५ जनावरांचे ३० ते ४० हजार रुपये मिळतात. गाेवंश तस्करीच्या गाेरखधंद्यातील दलाल गांधीनगर येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत असून मागील अनेक वर्षांपासून त्यांचे स्थानिक पाेलिसांशी मधुर संबंध असल्याची माहिती आहे. दरम्यान, दलालाने जनावरांची खरेदी करण्यासाठी टाेळी तयार केली असून या माध्यमातून हा धंदा जाेमात सुरू आहे. पाळीव जनावरे पुरवठा करणाऱ्या दलालांना प्रति जनावर ५०० रुपये कमिशन दिले जात आहे. कायद्याने पाळीव जनावरे व गाेवंश तस्करी व विक्रीवर बंदी आहे. मात्र देसाईगंज तालुक्यात कत्तलीसाठी पाळीव जनावरे पुरविण्याचा धंदा सध्या जाेमात सुरू आहे. मात्र या गाेरखधंद्याला पाेलीस विभागाची मूकसंमती असल्याचे बाेलल्या जात आहे.

बाॅक्स... वाघाच्या भीतीने तस्करांचे फावले

देसाईगंज तालुका मुख्यालयापासून १२ किमी अंतरावर असलेले कळमगाव हे जंगलव्याप्त गाव असून या गावाच्या परिसरात वाघाचे अस्तित्व असल्याने काेणत्याही प्रशासकीय विभागाचे अधिकारी व कर्मचारी या भागात दाैरे करीत नाहीत. कारवाईची जबाबदारी असलेल्या पाेलीस विभागाचीसुद्धा या जंगलव्याप्त गावात जाऊन धाडसत्र राबविण्याची हिंमत दिसून येत नाही. एकूणच वाघाच्या भीतीने पाळीव जनावर तस्करांचे चांगलेच फावले आहे.