शिक्षक भारती संघटनेचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 04:26 IST2021-02-19T04:26:10+5:302021-02-19T04:26:10+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क गडचिराेली : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आ. कपिल पाटील यांच्या नेतृत्वात शिक्षणमंत्री वर्षा ...

Statement of Shikshak Bharati Sanghatana to the Minister of Education | शिक्षक भारती संघटनेचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन

शिक्षक भारती संघटनेचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन

लाेकमत न्यूज नेटवर्क

गडचिराेली : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आ. कपिल पाटील यांच्या नेतृत्वात शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची भेट घेऊन प्राथमिक शिक्षकांच्या समस्यांबाबत निवेदन देऊन चर्चा केली.

२००५ नंतर नियुक्त झालेल्या सर्व शिक्षकांना जुनी पेंशन याेजना लागू करावी, वस्तीशाळा शिक्षकांची मूळ नियुक्ती दिनांकापासून सेवा ग्राह्य धरावी, प्राथमिक पदवीधर व विषय शिक्षकांना सरसकट ४ हजार ३०० रुपये ग्रेड-पे देण्यात यावा, बदली धाेरणातील त्रुटी दूर करून १०० टक्के आंतरजिल्हा बदल्या कराव्यात, शिक्षण सेवकांना २५ हजार रुपये मानधन द्यावे, २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करू नयेत, मुलींचा उपस्थिती भत्ता प्रतिदिन १० रुपये करावा, राज्यातील सर्व शिक्षकांचे वेतन १ तारखेला करावे आदी मागण्यांबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी शिक्षक भारती संघटनेचे अध्यक्ष नवनाथ गेंड, गडचिराेलीचे जिल्हाध्यक्ष पुंडलिक देशमुख, सचिव आर. एस. बिट्टीवार, कार्याध्यक्ष अमरदीप भुरले, तुळशीदास ठलाल, रवींद्र गावंडे, रघुपती मुरमाडे, गुरुदेव साेमनकर, खुशाल भुरसे, संजय मेश्राम, जीवन काटेंगे आदी उपस्थित हाेते.

Web Title: Statement of Shikshak Bharati Sanghatana to the Minister of Education