शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
2
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
3
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
4
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
5
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
6
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
7
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
8
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
9
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
10
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
11
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
12
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
13
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
14
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
15
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
16
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
17
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
18
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
19
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
20
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
Daily Top 2Weekly Top 5

बांबू तोड प्रक्रिया तत्काळ सुरू करा

By admin | Updated: March 12, 2015 02:08 IST

वन विभागाकडून बांबू उपलब्ध होत नसल्याने पेपर मिल कंपनीकडून कामगार कपात व उद्योग बंद होण्याची शक्यता आहे. परिणामी शेकडो कुटुंबावर बेकारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. त्

अहेरी : वन विभागाकडून बांबू उपलब्ध होत नसल्याने पेपर मिल कंपनीकडून कामगार कपात व उद्योग बंद होण्याची शक्यता आहे. परिणामी शेकडो कुटुंबावर बेकारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. त्यामुळे हजारो नागरिकांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी वन विभागाने तत्काळ बांबू तोड प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी पेपर मील कामगार, मजूर व अहेरी तालुका काँग्रेसच्या वतीने राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे करण्यात आली आहे. यासंदर्भात भामरागडचे उपवनसंरक्षक संजय हलमारे यांच्या मार्फत वनमंत्री मुनगंटीवार यांना निवेदन पाठविण्यात आले आहे. पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरात पेपर मिल उद्योग आहे. तसेच गडचिरोली जिल्ह्यातील आष्टी येथेही बिल्ट कंपनीचा कागद कारखाना आहे. या दोनही पेपर मिलमध्ये नियमित, कंत्राटी व रोजंदारी तत्त्वावर १५ हजार पेक्षा अधिक कामगार काम करीत आहेत. पेपर मिल उद्योगामुळे इतर शेकडो नागरिकांनादेखील मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होत आहे. मात्र वन विभागाकडून बांबू तोड प्रक्रिया बंद असल्यामुळे या पेपर मिलला बांबू मिळणे कठिण झाले आहे. त्यामुळे कागद उद्योग बंद होण्याची भीती निर्माण झाली आहे, विहीत कालावधीत बांबू न तोडल्यास बांबू निकामी होतो, असेही निवेदनात म्हटले आहे. निवेदन देताना कामगार युनियनेच सदस्य सुरेश उराडे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेबुब अली, युका विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष बालाजी गावडे, एम. एम. देशमुख, एम. के. गुडधे, एस. एस. मोटे आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)