सौरऊर्जा प्लेट ठरत आहे शोभेची वस्तू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:33 IST2021-04-14T04:33:29+5:302021-04-14T04:33:29+5:30

एका खासगी कंपनीने गडचिरोली जिल्ह्यातील बहुतेक ग्रा.पं.मधील योजने जवळ किंवा ग्रामपंचायत कार्यालयाजवळ सौरऊर्जा प्लेट लावून विजेची बचत करण्यासाठी ही ...

Solar plate is becoming a decorative item | सौरऊर्जा प्लेट ठरत आहे शोभेची वस्तू

सौरऊर्जा प्लेट ठरत आहे शोभेची वस्तू

एका खासगी कंपनीने गडचिरोली जिल्ह्यातील बहुतेक ग्रा.पं.मधील योजने जवळ किंवा ग्रामपंचायत कार्यालयाजवळ सौरऊर्जा प्लेट लावून विजेची बचत करण्यासाठी ही योजना राबविण्यात आली आणि यासाठी १४ व्या वित्त आयोगामधून लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला, पण हा सगळा खर्च पाण्यात गेला. वैरागड येथे पाणी योजनेच्या जवळ ज्या सौरऊर्जा प्लेट लावण्यात आल्या. त्याचा अजिबात उपयोग झाला नाही. या सौरऊर्जा प्लेटमुळे विजेची तर बचत झाली नाही, पण झालेला खर्च पाण्यात गेला आहे. त्यामुळे या योजनेच्या मूळ उद्देशाला हरताळ फासला गेला. ज्या ग्रामपंचायतींनी लाखो रुपयांचा खर्च केला, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. या सगळ्या कामात मोठा आर्थिक गैरप्रकार झाला असून, या सगळ्या प्रकरणाची व तत्कालीन अधिकारी चौकशी करावी, अशी मागणी होत आहे . योजना राबविणारे वरिष्ठ अधिकारी आणि ज्या कंपनीने ही योजना ग्रामपंचायतीपर्यंत पोहोचली, त्या सगळ्या प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी नागरिकांची मागणी आहे.

===Photopath===

130421\13gad_3_13042021_30.jpg

===Caption===

वैरागडातील नळ योजनेजवळ लावलेल्या सौर ऊर्जा प्लेट

Web Title: Solar plate is becoming a decorative item