शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
2
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
3
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
4
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
5
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
6
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
7
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
8
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
9
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
10
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
11
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
12
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
13
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
14
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
15
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
16
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
17
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
18
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
19
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
20
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
Daily Top 2Weekly Top 5

सिरोंचा बसस्थानकाचे काम थंडबस्त्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 05:01 IST

सिरोंचा हे शहर राष्ट्रीय महामार्गावर असून गोदावरी, प्राणहिता व इंद्रावती या तीन नद्यांच्या तिरावर वसले आहे. पुलाच्या बांधकामामुळे सिरोंचा हे तेलंगणा, महाराष्ट्र व छत्तीसगड या तीन राज्यांसाठी महत्त्वाचे ठिकाण बनले आहे. तेलंगणा, महाराष्ट्र राज्यातून या ठिकाणी बसेस येतात. इंद्रावती नदीवरील पुलाचे बांधकाम झाल्यानंतर छत्तीसगड राज्यातूनही बससेवा सुरू होईल. त्यामुळे सिरोंचा येथे प्रवाशांची नेहमीच गर्दी राहते.

ठळक मुद्देनिधी प्राप्त न झाल्याचा परिणाम : साडेचार महिन्यांपासून कामात प्रगती नाही

लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : शासनाच्या पाच कोटी रूपयांच्या निधीतून सिरोंचा येथे बसस्थानक इमारतीचे बांधकाम सुरू करण्यात आले होते. हे काम कोरोना लॉकडाऊनपर्यंत योग्यरित्या चालले. मात्र त्यानंतरचा निधी प्राप्त न झाल्याने हे काम संबंधित कंत्राटदाराने बंद पाडले आहे. गेल्या साडेचार महिन्यांपासून हे काम थंडबस्त्यात पडले असल्यामुळे नागरिकांची चांगलीच गैरसोय होत आहे. याच गतीने हे काम सुरू राहिल्यास ते नियोजित कालावधीत पूर्ण होण्याची शक्यता नाही.सिरोंचा हे शहर राष्ट्रीय महामार्गावर असून गोदावरी, प्राणहिता व इंद्रावती या तीन नद्यांच्या तिरावर वसले आहे. पुलाच्या बांधकामामुळे सिरोंचा हे तेलंगणा, महाराष्ट्र व छत्तीसगड या तीन राज्यांसाठी महत्त्वाचे ठिकाण बनले आहे. तेलंगणा, महाराष्ट्र राज्यातून या ठिकाणी बसेस येतात. इंद्रावती नदीवरील पुलाचे बांधकाम झाल्यानंतर छत्तीसगड राज्यातूनही बससेवा सुरू होईल. त्यामुळे सिरोंचा येथे प्रवाशांची नेहमीच गर्दी राहते. गडचिरोली जिल्ह्यातील अनेक भाविक व पर्यटक कालेश्वर मंदिर व मेडिगड्डा धरण पाहण्यासाठी येतात. त्यामुळे या ठिकाणी गर्दी उसळते. सिरोंचा येथे सर्व सोयीसुविधायुक्त सुसज्ज बस स्थानक व्हावे, अशी मागणी येथील जनतेने अनेक वर्षांपासून केली होती.सिरोंचा येथे हायटेक बस स्थानक व्हावे, यासाठी तत्कालीन राज्य शासनाकडे लोकप्रतिनिधी, राजकीय पदाधिकाऱ्यांनी पाठपुरावा केला होता. त्यानंतर राज्य सरकारच्या वतीने सिरोंचा येथे सिरोंचा येथील बसस्थानकासाठी पाच कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला. सिरोंचा शहर हे महत्त्वाचे शहर असून गडचिरोली जिल्हा होण्यापूर्वी या शहराला तालुक्याचा दर्जा प्राप्त झाला होता. सिरोंचा येथे सोमनूर संगम, कालेश्वर व इतर पर्यटनस्थळे असल्याने पर्यटकांची तालुक्यात वर्दळ असते. मात्र सिरोंचा येथे प्रशस्त बसस्थानक नसल्याने दूरवरून आलेल्या प्रवाशांची परवड होत असते. नव्या स्वरूपाच्या बसस्थानक इमारतीचे काम सुरू करण्यात आल्यानंतर शहर व तालुक्यातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले होते. सिरोंचा भागातील वाहतूक सेवा बळकट होणार शिवाय प्रवाशांना सोयीसवलती मिळणार, अशी अपेक्षा होती, ही अपेक्षा आताही कायम आहे. मात्र आता निधी संपल्याच्या कारणावरून संबंधित कंत्राटदारांनी बसस्थानक इमारतीचे काम बंद केल्याने नागरिकांची सरकारप्रती नाराजी दिसून येत आहे. राज्य शासनाने सिरोंचा शहरातील बसस्थानकाचे काम पूर्ण होण्यासाठी मंजूर केलेला संपूर्ण निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी होत आहे.पहिल्या टप्प्यातील पावणे दोन कोटी खर्चसिरोंचा येथील बसस्थानक इमारतीच्या कामासाठी शासनाकडून पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. त्यापैकी प्रशासनाला पहिल्या टप्प्यात शासनाकडून जवळपास १ कोटी ८५ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला. या प्राप्त निधीतून कंत्राटदाराने बसस्थानक इमारतीचे काम केले. आता निधी संपल्याने कंत्राटदाराचे पुढील कामाचे देयक रखडले आहे. कोरोना लॉकडाऊनपासून हे काम बंद आहे. शासनाने सदर कामासाठीचा उर्वरित निधी लवकर उपलब्ध करून द्यावा, जेणेकरून हे काम मार्गी लागेल, असे नागरिकांचे म्हणणे आहे. सिरोंचा बसस्थानकाचे काम पूर्णत्वास जाण्यासाठी लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी आहे.

टॅग्स :state transportएसटीtourismपर्यटन