हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांचा आत्मदहनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2020 05:00 AM2020-07-09T05:00:00+5:302020-07-09T05:00:55+5:30

यासंदर्भात आरोग्य सेवा कर्मचारी महासंघाच्या वतीने जिल्हा हिवताप अधिकाºयांना ७ जुलै रोजी निवेदन देण्यात आले आहे. निवेदनावर संघटनेचे जिल्हाध्यक्ष इरफान रहमद शेख व फवारणी कर्मचारी क्षेत्र कार्यकर्ता गजानन कोठारे यांची स्वाक्षरी आहे. निवेदनात म्हटल्यानुसार, हंगामी फवारणी कामगार हे हिवताप कार्यालयाच्या आस्थपनेवर सन १९७२ पासून फवारणीचे काम करीत आहेत.

Seasonal spraying staff self-immolation warning | हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांचा आत्मदहनाचा इशारा

हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांचा आत्मदहनाचा इशारा

Next
ठळक मुद्दे..तर कामबंद आंदोलन : हिवताप अधिकाºयाकडून आश्वासनाला तिलांजली दिल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या प्रलंबित आहेत. जिल्हा हिवताप अधिकाºयांकडून अनेक वेळा दिलेल्या आश्वासनांची पूर्तताही करण्यात आली नाही. त्यामुळे त्रस्त झालेल्या हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांनी आधी कामबंद आंदोलन करून त्यानंतरही न्याय न मिळाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.
यासंदर्भात आरोग्य सेवा कर्मचारी महासंघाच्या वतीने जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांना ७ जुलै रोजी निवेदन देण्यात आले आहे. निवेदनावर संघटनेचे जिल्हाध्यक्ष इरफान रहमद शेख व फवारणी कर्मचारी क्षेत्र कार्यकर्ता गजानन कोठारे यांची स्वाक्षरी आहे. निवेदनात म्हटल्यानुसार, हंगामी फवारणी कामगार हे हिवताप कार्यालयाच्या आस्थपनेवर सन १९७२ पासून फवारणीचे काम करीत आहेत. शासन निर्णय असूनही सेवेत सामावून घेण्यात आले नाही. गेल्या २५ वर्षांपासून फवारणी कामगारांवर अन्याय होत आहे. जिल्हा हिवताप अधिकाºयांनी जुन्या फवारणी कामगारांना बंद करून नवीन कामगारांना कामावर घेण्याचा प्रकार सुरू केला आहे. परिणामी जुन्या फवारणी कामगारांवर व त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची पाळी आली आहे.
गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात हिवताप कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले होते. त्यावेळी हिवताप अधिकाºयांनी आश्वासन देऊन त्यांचे उपोषण उठवले. पण नंतर आपलाच शब्द पाळला नाही, असे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

निवेदनातील मागण्या
हंगामी फवारणी कामगारांना १९७२ पासूनची ज्येष्ठता द्यावी, २००४ पूर्वीची हंगामी फवारणी कर्मचाºयांची यादी गहाळ केली त्याबद्दल संबंधितांवर कारवाई करावी, जीआरनुसार १६९ दिवस काम देण्यात यावे, कामाचे आदेश दिल्यावर २५ लाखांचा विमा देण्यात यावा, सेवेत कायम सामावून घ्यावे, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ३० जानेवारी २०२० रोजी दिलेल्या निकालाची अंमलबजावणी करण्यात यावी आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. सदर मागण्यांचे निवेदन जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांसह जिल्हाधिकाºयांना देण्यात आले आहे.

Web Title: Seasonal spraying staff self-immolation warning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य