काेराेनाच्या संकटातून सावरताना जिल्हाभरात वाढतेय तापाची साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 05:00 IST2021-07-31T05:00:00+5:302021-07-31T05:00:32+5:30

पावसाळ्यामध्ये ताप, सर्दी, खाेकला, डाेकेदुखी, अंगीदुखी हे सामान्य आजार निर्माण हाेतात. दवाखान्यात जाऊन उपचार केल्यानंतर हे आजार सहज बरे हाेत हाेते. आता मात्र उपचारांसाठी रुग्णालयात गेल्यास काेराेनाची चाचणी करण्याची भीती नागरिकांमध्ये असल्यामुळे काही नागरिक दवाखान्यात जाऊन उपचार करण्यासाठी तयार नाहीत, तर काही नागरिक खासगी रुग्णालयांमध्ये जाऊन उपचार करीत आहेत. 

Rising fever across the district as Kareena recovers from the crisis | काेराेनाच्या संकटातून सावरताना जिल्हाभरात वाढतेय तापाची साथ

काेराेनाच्या संकटातून सावरताना जिल्हाभरात वाढतेय तापाची साथ

ठळक मुद्देलहान मुलांना ताप आल्यास काळजी घ्या; वेळीच करून घ्या काेराेनाचीही चाचणी

दिगांबर जवादे
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : जिल्ह्यात काेराेनाचे संकट कायम असताना पावसाळ्यापासून जिल्हाभरात तापाची साथ पसरली आहे. तापावर उपचार करण्यासाठी रुग्णालयात गेल्यास काेराेना चाचणी करण्याची भीती नागरिकांमध्ये कायम असल्याने अजूनही काही नागरिक अंगावरच ताप धरून राहत असल्याचे दिसून येत आहे. 
पावसाळ्याला सुरुवात झाल्यानंतर डासांची पैदास वाढते. नदी, विहिरीचे पाणी गढूळ हाेते, तसेच वातावरणात बदल हाेते. त्यामुळे पावसाळ्यामध्ये ताप, सर्दी, खाेकला, डाेकेदुखी, अंगीदुखी हे सामान्य आजार निर्माण हाेतात. दवाखान्यात जाऊन उपचार केल्यानंतर हे आजार सहज बरे हाेत हाेते. आता मात्र उपचारांसाठी रुग्णालयात गेल्यास काेराेनाची चाचणी करण्याची भीती नागरिकांमध्ये असल्यामुळे काही नागरिक दवाखान्यात जाऊन उपचार करण्यासाठी तयार नाहीत, तर काही नागरिक खासगी रुग्णालयांमध्ये जाऊन उपचार करीत आहेत. 

ताप आला म्हणजे काेराेना आहे असे नाही
एखाद्या व्यक्तीला ताप आला म्हणजे, काेराेना आहे असे हाेत नाही. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित व्यक्तीची सर्वप्रथम काेराेना चाचणी करण्याचे निर्देश आहेत. याचे पालन खासगी दवाखान्यांनीसुद्धा करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. या निर्देशांचे सर्वच ठिकाणी कटाक्षाने पालन करणे गरजेचे आहे. अन्यथा काेराेनाची तिसरी लाट आल्यास त्याचा फैलाव वेगाने हाेईल.

सारख्याच   लक्षणांमुळे संभ्रम
काेराेनाची लागण झाल्यास ताप येणे, अंगदुखी, डाेकेदुखी, खाेकला, आदी लक्षणे दिसून येतात. पावसाळ्यामध्ये अनेकांना ताप आल्यानंतर अंगदुखी, डाेकेदुखीची समस्या उद्भवते. त्यामुळे ताप आल्यानंतर त्याला काेराेना समजायचा की सामान्य ताप आहे हे सहजासहजी लक्षात येत नाही. 

बालकांसाठी २० टक्के खाटा राखीव
काेराेनाची तिसरी लाट बालकांसाठी घातक ठरू शकते, असा अंदाज काही तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. त्यामुळे आराेग्य विभागाने खबरदारीचा उपाय म्हणून २० टक्के खाटा राखीव ठेवल्या आहेत. 

 

Web Title: Rising fever across the district as Kareena recovers from the crisis

टॅग्स :Healthआरोग्य