पावसाने दोन घरे कोसळली

By Admin | Updated: September 1, 2016 01:47 IST2016-09-01T01:47:18+5:302016-09-01T01:47:18+5:30

अहेरीसह तालुक्यात मंगळवारी झालेल्या वादळी पावसामुळे अनेक घरांचे नुकसान झाले. तालुक्यातील अनेक घरांची पडझड झाली.

The rain collapsed two houses | पावसाने दोन घरे कोसळली

पावसाने दोन घरे कोसळली

अहेरीत वादळी पाऊस : येनगंटीवार व दंडीकेवार यांचे नुकसान
अहेरी : अहेरीसह तालुक्यात मंगळवारी झालेल्या वादळी पावसामुळे अनेक घरांचे नुकसान झाले. तालुक्यातील अनेक घरांची पडझड झाली. अहेरी येथील रेखा येनगंटीवार व विस्तारी दंडीकेवार यांच्या घराची अनुक्रमे भिंत व घराचे छत कोसळून नुकसान झाले.
अहेरी येथील तहसील कार्यालयासमोरील रेखा प्रभाकर येनगंटीवार, राजू प्रभाकर येनगंटीवार हे माता-पूत्र बाजुच्या खोलीत झोपले असताना घराची भिंत कोसळली. त्यानंतर पूर्ण छत कोसळले. मात्र यात कुठलीही सुदैवाने जीवितहानी झाली नाही. त्यामुळे येनगंटीवार यांचे जवळपास १ लाखाचे नुकसान झाले. बेघर कॉलनीतील विस्तारी मलय्या दंडीकेवार यांच्या घराचे छत पडून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्यामुळे यात त्यांना ५० हजारांचा फटका बसला. प्रभागाचे नगरसेवक शैलेंद्र पटवर्धन यांनी दोन्ही घरी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर तहसीलदार व तलाठ्यांना याबाबत माहिती देऊन नुकसानीचा तत्काळ पंचनामा करण्याची विनंती केली. वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने अहेरीतील दोन घर पूर्णत: जमीनदोस्त झाले तर काही घरांना जोरदार तडाखा बसला. अनेक घरावरील कवेलू वादळी वाऱ्याने उडाल्या. तालुक्यातील अनेक मार्गांवर झाडे कोसळून वाहतुकही दुसऱ्या दिवशी सकाळी ठप्प झाली होती. तालुक्यातील अनेक घरांना वादळाचा तडाखा बसला. (प्रतिनिधी)

Web Title: The rain collapsed two houses