शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

वडसा भूमिगत पुलाच्या बांधकामास रेल्वेची मंजुरी

By admin | Updated: October 29, 2016 01:44 IST

रेल्वे स्थानकावरील बहुप्रतिक्षीत भूमिगत पुलाच्या अप्रोच रस्त्याला दक्षिण पूर्व मध्य रेल्वे प्रशासनाने मंजुरी प्रदान केली

देसाईगंज : रेल्वे स्थानकावरील बहुप्रतिक्षीत भूमिगत पुलाच्या अप्रोच रस्त्याला दक्षिण पूर्व मध्य रेल्वे प्रशासनाने मंजुरी प्रदान केली असून लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे, अशी माहिती प्राप्त झाली आहे. रेल्वे क्राँसिंगमुळे देसाईगंज शहर दोन भागात विभागल्या गेला आहे. एका भागात रहिवासी असून दुसऱ्या भागात बाजारपेठ आहे. परिणामी रहिवासी भागात वास्तव्यास असलेल्या नागरिकांना दिवसातून अनेकवेळा बाजार परिसरात ये-जा करावे लागते. ये-जा करताना रेल्वे रूळ ओलांडावेच लागते. या रेल्वे मार्गावरून दिवसातून अनेकवेळा रेल्वे गाड्या ये-जा करीत असल्याने १० ते १२ वेळा रेल्वे फाटक पडते. परिणामी नागरिकांना तासणतास ताटकळत राहावे लागते. रहिवाशांसाठी ही मोठी डोकेदुखी आहे. याबाबत वडसा रेल्वे सल्लागार समिती तसेच गडचिरोली जिल्ह्याच्या खासदार अशोक नेते यांनी वारंवार पाठपुरावा केला. जिल्हाधिकारी ए.एस.आर नायक यांनी देखील या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली. भूमिगत रेल्वे पुलाच्या अ‍ॅप्रोच रस्त्याला लागून असलेले अतिक्रमण काढण्याबाबत गडचिरोली जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग व मुख्याधिकारी यांना पत्र पाठवून अतिक्रमण काढून तातडीने काम सुरू करण्यात येणार आहे. (तालुका प्रतिनिधी)अतिक्रमण हटविणारभूमिगत पुलाच्या अ‍ॅप्रोच रस्त्याच्या बांधकामाला रेल्वेने मंजुरी प्रदान केल्याने या मार्गावरील अतिक्रमण काढावे लागणार आहे. सदर पूल व रस्ता झाल्यास देसाईगंजवासीयांची वाहतुकीची समस्या कमी होण्यास मदत होणार आहे.